✒️प्रविण जगताप, वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी
मोबा, न, 9284981757
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- शाळेचे आणि गुरूचे स्थान हे प्रत्येक विद्यार्थ्याच्या खूप महत्वाचे असते. पण जेव्हा शाळेतील मुख्याध्यापक विद्यार्थि व पालकांसोबत अरेरावीची वागणूक करत असेल तर त्याशाळेतील वातावरण कसं असू शकते हे समजण्यासाठी पलीकडे आहे. अशीच माहिती हिंगणघाट येथून समोर आली आहे.
हिंगणघाट येथील रत्नविद्यानिकेतन या संस्थेच्या शाळेतील मुख्याध्यापक अजयकुमार यादव यांच्या अरेरावी व धमकीच्या वर्तणुकीमुळे शाळेतील विद्यार्थ्यावर प्रचंड मानसिक ताण पडलेला असून फी साठी विद्यार्थी वर्गाला अतिशय अपमानास्पद रित्या वागणूक देण्यात आल्याने पालकांच्या मनात या मुख्याध्यापका विषयी असंतोष निर्माण झालेला.या संस्थेने ब शिक्षणाधिकारी यांनी त्वरित या मुख्याध्यापकाची चौकशी करून त्याच्यावर योग्य ती कारवाई करावी अशी नागरिकांची मागणी आहे.
या मुख्याध्यापकाने शाळेतील विध्यार्थी वर्गाकडून मार्च, एप्रिल व मे या तीन महिन्यांची फी जबरदस्तीने व दादागिरीने वसूल करण्यासाठी या विद्यार्थ्यांशी आशिष्ट वर्तन केले.व जोपर्यत फी भरत नाही तो पर्यंत शाळेत येऊ नका अशी तंबी भरली.अनेक पाल्याना घरी पाठवून त्यांच्या पालकांना बोलावून फी भरावयास सांगितली. काही पालकांनी यावर चर्चा करण्याचा प्रयत्न केला असता सदर मुख्याध्यापक यांनी पाल्याच्या समोर त्यांच्या पालकां सोबत अयोग्य शब्दात वाद घातला. या मुख्याध्यापका वर शालेय प्रशासन व शिक्षण विभागाने चौकशी करून कडक कारवाई करावी अशी संतप्त पालकांची मागणी केली आहे.
★★★★★★★★★★★★★★★★★★★
आपल्या परिसरातील बातम्या व घडामोडी बघण्याकरीता आजच महाराष्ट्र संदेश न्यूजच्या वेबसाईट www.maharashtrasandesh.com ला भेट द्या. 9766445348/7385445348