पंकेश जाधव पुणे ब्यूरो चीफ (7020794626)
खंडणी विरोधी पथक पिंपरी चिंचवड शह
महाराष्ट्र संदेश न्यूज ऑनलाईन पुणे :- पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयातील चैन स्नॅचिंग, वाहन चोरी मोबाईल चोरी, घरफोडीचे गुन्हयास प्रतिबंध व्हावा व गुन्हे उघडकीस आणावेत याबाबत वरिष्ठांनी दिलेल्या सुचना प्रमाणे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद पवार यांनी दिलेल्या आदेशाप्रमाणे, खंडणी विरोधी पथकाकडील स्टाफ मार्फत उघडकीस न आलले वाहन चोरी गुन्हयांचा समांतर तपास करीत असतांना पोलीस नाईक आशिष बोटके यांना मिळालेल्या खात्रीशीर बातमीवरुन मर्सडिज कंपनीचे मागील बाजुस, चाकण एमआयडीसी ता.खेड जि.पुणे याठिकाणी सापळा लावुन, १ ) प्रतिक दत्तात्रय भालेराव वय ३१ वर्षे रा. सध्या भाऊसाहेब बोबडे यांचे खोलीत, सिध्दीविनायक नगर, कडाचीवाडी, चाकण, पुणे मुळगाव- कंदळी वडगाव, ता. जुन्नर, जि. पुणे २) संदीप रामचंद्र ढोंगे वय २७ वर्षे रा. सध्या. शिंदे यांचे खोलीत, सिध्दीविनायक नगर कडाचीवाडी, चाकण, पुणे मुळगाव-मु.सावळा, पो. खांडी, ता. मावळ, जि.पुणे यांना ताब्यात घेवुन त्याचेकडे विचारपुस करता, त्याने तळेगाव दाभाडे पोलीस ठाणे गुन्हा रजि. नं. १७६/२०२२ भादवि कलम ३७९ प्रमाणे गुन्हा दाखल गुन्हयातील दुचाकी वाहन तसेच पिंपरी एमआयडीसी, तळेगाव एमआयडीसी, चाकण एमआयडीसी तसेच रांजणगाव एमआयडीसी, पुणे ग्रामीण या भागातुन आणखी दुचाकी वाहने चोरी केल्याचे सांगितलेने त्यास सदर गुन्हयात दिनांक ०६ / ०४ / २०२३ रोजी अटक करुन त्याची ०५ दिवस पोलीस कस्टडी घेवुन, कस्टडी दरम्यान तपास करुन त्याचेकडुन किं… ५,०५,०००/- रुपये किंमतीचे १३ दुचाकी वाहने व ०२ मोबाईलफोन हस्तगत करून चाकण पो.स्टे. कडील ०३ गुन्हे, पिंपरी पो.स्टे.कडील ०२ गुन्हे, महाळुंगे एमआयडीसी पो.स्टे. कडील ०१ गुन्हे, सांगवी पो.स्टे. कडील ०१ तळेगाव दाभाडे पो.स्टे. कडील ०१ व रांजणगाव पो.स्टे. पुणे ग्रामीण कडील ०१ गुन्हे, असे एकुण ०९ वाहन चोरीचे गुन्हे उघडकीस आणले आहेत.
सदरची कारवाई मा. विनय कुमार चौबे साो, पोलीस आयुक्त, पिंपरी चिंचवड, मा. मनोज लोहीया, सह पोलीस आयुक्त, मा. डॉ. संजय शिंदे, अपर पोलीस आयुक्त, मा. स्वप्ना गोरे, पोलीस उप-आयुक्त, गुन्हे, मा. डॉ. प्रशांत अमृतकर, सहा. पोलीस आयुक्त, गुन्हे यांचे मार्गदर्शनाखाली खंडणी विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद पवार, सहा. पोलीस निरीक्षक उध्दव खाडे, सहा.पो.उप निरी. अशोक दुधवणे, अमर राऊत, पोलीस अंमलदार रमेश गायकवाड, सुनिल कानगुडे, निशांत काळे, किरण काटकर, प्रदीप गोडांबे, विजय नलगे, ज्ञानेश्वर कु-हाडे, आशिष वोटके, शैलेश मगर, सुधीर डोळस, प्रदीप गुट्टे यांचे पथकाने केली आहे.