पंकेश जाधव पुणे ब्यूरो चीफ (7020794626)
समर्थ पोलीस स्टेशन, पुणे शहर
महाराष्ट्र संदेश न्यूज ऑनलाईन पुणे :- समर्थ पोलीस स्टेशनच्या हददीत काही दिवसांपासून रिक्षांचे टायर चोरी झाल्याबाबतचे अनुशंगाने वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. रमेश साठे यांनी तपास पथकाचे अधिकारी सपोनि प्रसाद लोणारे, पोउनि सौरभ माने, पोलीस अंमलदार, रहीम शेख, हेमंत पेरणे यांना तपासाचे आदेश दिलेले होते. उपसाचे दरम्यान रात्रीच्या वेळी एक रिक्षा त्याभागात येवुन रिक्षाच्या बाजुला रिक्षा लावुन चोरी करीत असल्याचे दिसुन आले. चोरी करणा-या रिक्षाचा ब्रेक मारल्यास पाठीमागे फ्लैश लाईट लागत असल्याचे दिसुन आल्याने पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी सलग पाच दिवस रात्रीच्या वेळी ब्रेक मारल्यास पाठीमागे फ्लॅश लाईट लागणा-या रिक्षा शोधण्यासाठी, रिक्षा पार्क केलेल्या ठिकाणी दिनांक ११/०४/२०२३ रोजी ट्रॅप लावला असता, नमुद प्रकारची एक रिक्षा फिरतांना मिळुन आल्याने त्या रिक्षाचा पाठलाग करुन ताब्यात घेवून चेक केली असता, रिक्षातील काही पोत्या मध्ये ०८ रिक्षाचे टायर (स्टेफनीसह) व ०२ बॅट-या मिळुन आल्या आहेत.
सदरची संशईत रिक्षा पोलीस स्टेशन येथे आणुन सखोली चौकशी केली असता इसम नाम शादाब युसुफ अन्सारी, वय २२ रा. गल्ली नं. २५. सैयदनगर, मोहमंदवाडी रोड, हडपसर, मुळ रा. दिल्ली याने पुणे शहरातुन विविध भागातून रात्रीच्या वेळी पार्क केलेल्या रिक्षांचे टायर व बॅट-या चोरल्याची कबुली दिली असुन सदर आरोपी याचेकडुन एकुण २५ रिक्षाचे (स्टेफनीसह) टायर व दोन रिक्षाच्या बॅट-या व एक रिक्षा असा एकुण २,५८,०००/- रुपये किया मुद्देमाल जप्त करण्यात आलेला असून, त्याचेकडुन समर्थ पोस्टे ०३, हडपसर पोस्टे ०१, वानवडी पोस्टे ०१ असे एकुण ०५ गुन्हे उघडकीस आणलेले आहेत. सदर आरोपी हा रेकॉर्डवरील असुन त्याचेवर एकुण ०६ चोरीचे गुन्हे दाखल आहेत. आरोपी हा
भाडेतत्वार रिक्षा चालवत होता व रात्रीच्या वेळी रस्यावर पार्क केलेल्या रिक्षांचे टायर व बैटरी चोरी करीत होता. पार्क केलेल्या रिक्ष्याच्या बाजुला आरोपी त्याची रिक्षा पार्क करायचा व बाजुच्या रिक्षाचे टायर किंवा बॅटरी चोरी करायचा. मागील काही महीन्यापासून पुणे शहरातील विवीध भागातून रिक्षाचे टायर व बॅट-या चोरी होत होत्या, नगुद आरोपी यास वरील गुन्हयात अटक करण्यात आलेली असुन तो सध्या पोलीस कस्टडीमध्ये आहे. सदर गुन्हयाचा पुढील तपास सपोनि प्रसाद लोणारे हे करीत आहेत.
सदरची कामगिरी ही मा. अपर पोलीस आयुक्त, पश्चिम प्रादेशीक विभाग, पुणे शहर, श्री. राजेंद्र डहाळे, मा. पोलीस उप आयुक्त परिमंडळ -१, पुणे शह, श्री. संदीप सिंह गिल्ल, मा. सहाय्यक पोलीस आयुक्त, फरासखाना विभाग, पुणे, श्री. सतिश गोवेकर यांचे मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक, समर्थ पोलीस स्टेशन, श्री. रमेश साठे, पोलीस निरीक्षक (गुन्हे), श्री प्रमोद वाघमारे यांचे सुचनेनुसार समर्थ पोलीस स्टेशन तपास पथकाचे सहा. पोलीस निरीक्षक प्रसाद लोणारे, पोउनि, सौरभ माने, पोउनि सौरभ थोरवे, पोलीस अंमलदार, दत्तात्रय भोसले, रोहीदास वाधीरे, गणेश वायकर, रहिम शेख, हेमंत पेरणे, अमोल शिंदे, मंगेश जाधव, शरद घोरपडे, संदीप पवार, ज्ञानेश्वर सुर्यवंशी, निलेश जमधडे यांनी केली आहे.

