युवराज मेश्राम नागपूर जिल्हा प्रतिनिधी
नागपूर:- जिहातील कळमेश्वर पंचायत समिती येथे 15 ऑगस्ट 2022 रोजी पंचायत समिती कळमेश्वरच्या प्रांगणामध्ये राष्ट्रध्वजाचे ध्वजारोहण पंचायत समितीचे सभापती सन्माननीय श्रावण दादा भिंगारे यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमाला प्रामुख्याने उपस्थित महेश्वरजी डोंगरे गटविकास अधिकारी पंचायत समिती कळमेश्वर, सहायक गटविकास अधिकारी रवी राठोड, मंगला गजभिये गटशिक्षणाधिकारी, टिंगरे साहेब, कुंटे साहेब माळवे साहेब, यादव व अधीक्षक श्री लिखर साहेब आणि इतर विभागाचे विभाग प्रमुख उपस्थित होते तसेच कळमेश्वर नगरीतील ज्येष्ठ नागरिकव सुद्धा प्रामुख्याने उपस्थित होते.
ध्वजारोहणानंतर गीत गायनाचा कार्यक्रम घेण्यात आला त्यामध्ये देशभक्तीपर राष्ट्रभक्तीपर गीत गायन करण्यात आले तसेच चहापानाचे आयोजन करण्यात आले त्यानंतर पंचायत समिती पासून तर पोलीस स्टेशन पर्यंत पायदल रॅलीचे आयोजन करण्यात आले पोलीस स्टेशन मध्ये पोहोचल्यानंतर तेथील आयोजित केलेल्या प्रदर्शनीचा साहित्य प्रदर्शनीचा सुद्धा आनंद घेण्यात आला व उपयुक्त अशी माहिती प्राप्त करून घेण्यात आली.