पंकेश जाधव पुणे ब्यूरो चीफ (7020794626)
वानवडी पोलीस स्टेशन पुणे शहर
महाराष्ट्र संदेश न्यूज ऑनलाईन पुणे :- वानवडी पोलीस ठाणे गु.र.नं. १६६/२०२३, भा.दं.वि. कलम ३७९ मधील फिर्यादी नामे सो. प्रियांका ज्ञानोधा कॉबडे या गुढीपाडवा सणासाठी त्यांचे माहेरी लातूर येथे गेल्या होत्या. जाताना त्यांनी सणाला घालण्यासाठी त्यांचेकडे असणारे १० तोळे वजनाचे सोन्याचे दागिने घेचून गेल्या होत्या. सण झालेनंतर त्या नर्मदा तू ट्रॅव्हलर्सच्या बसमधुन परत पुणे येत असताना दि. ०२/०४/२०१३ रोजी सकाळी ०६/०० वा. चे सुमारास काळुबाई मंदिर, क्रोम चौक, वानवडी, पुणे येथे उतरल्या. त्यावेळी त्यांचे लक्षात आले की, त्यांचे सॅकची चैन एका साईडला अर्धवट उघडी आहे. म्हणून संशय आल्याने त्यांनी त्यांचे सैंक उघडून पाहता त्यांचे एकुण १० तोळे वजनाचे दागिने त्यात नव्हते. यावरून फिर्यादी यांना त्यांचे दागिने चोरी झालेले असल्याची खात्री झालेनंतर त्यांनी सदराबाबत वानवडी पोलीस ठाणे येथे तक्रार दिल्याने सदरचायत वानवडी पोलीस ठाणे येथे गु.र.नं. १६६/ २०२३, भा.दं.वि. कलम ३७९ प्रमाणे मुन्हा दाखल झालेला आहे.
सदर गुन्हयाचा तपास करीत असताना वानवडी पोलीस ठाणे तपासपथक अधिकारी व अंमलदार यांनी वरिष्ठ पोलीस निरिक्षक भाऊसाहेब पटारे यांचे सूचनाप्रमाणे कार्यवाही करत पो. अंम. संदिप साळवे व विष्णु सुतार यांनी नमुद ट्रॅव्हल्समधील सीसीटीव्ही फुटेजची बारकाईने पाहणी करुन फुटेजमध्ये दिसून येणारे संशयीतांच्या डिटेल्स प्राप्त करुन घेवुन तात्रोक विश्लेषणावरून संशयीताचे राहते ठिकाणाबाबत माहीती घेतली असता, ते गंगाखेड जि. परभणी येथे असल्याबाबत माहीती मिळाल्यानं, लागलीच तपासपथक अधिकारी अजय भोसले, व पो. अंम, विनोद भंडलकर, महेश गाडवे, संदिप साळवे, विष्णु सुतार असे वरिष्ठांचे परवानगीने गंगाखेड जि. परभणी येथे जावुन पानील संशयीतांचा तेथे कसून शोध घेतला असता, नमुद्र संशयीत तेथे मेहबुबनगर गंगाखेड जि. परभणी येथील एका तांड्यामध्ये देशांतर करून राहत असताना देखील वर नमूद पॉलीस स्टाफनेही तेथे देशांतर करून प्रवेश केला. आणि यातील संशयीतांचा अतिशय चिकाटीने शोध घेवून त्यांची ओळख पटवून खात्री करून, त्यांना ताब्यात घेवून पानवडी पोलीस ठाणे येथे आणून, त्यांचेकडे दाखल गुन्हयाचे अनुशंगाने तपास केला असता त्यांनी दाखल गुन्हा केल्याचे पत्युल केल्याने त्यांना दाखल गुन्हयात अटक करून त्याचेकडे उत्कृष्टरित्या तपास करून त्यांचेकडुन त्यांनी यातील चोरी केलेले एकूण ८६ ग्रॅम वजनाचे ३,६४,०००/-रुपये किं.चे सोन्याचे दागिने तसेच त्यांचे वापरते ६ मोबाईल हॅन्डसेट आणि सोने मोजण्यासाठी त्यांचेकडे असलेला एक छोटा डिजीटल मिनी पॉकेट वजनकाटा व इतर कागदपत्रे असा एकुण ३,७६,०००/-रु. किं चा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलेला आहे. नमुद आरोपीतांची नावे खालीलप्रमाणे.
१) शिवा राजु शिंदे, वय ३० वर्षे, धंदा. काहीनाही, सध्या रा. दत्तमंदिरजवळ, मेहबुबनगर, गंगाखेड, पुणे मुळ पत्ता- सावित्रीनगर, चिखलठाण, औरंगाबाद व अटक आरोपी नामे २) के तेजा के सागर ऊर्फ गोपी ऊर्फ सुर्या शिंदे वय २० वर्षे, धंदा. काहीनाही, सध्या रा. दत्तमंदिरजवळ, मेहबुबनगर, गंगाखेड, जि. परभणी मुळ पत्ता- सावित्रीनगर, चिखलठाण, औरंगाबाद तसेच नमुद आरोपी हे मुळचे तेलंगणा येथील असुन त्यांची चोरी करणारी आंतरराज्यीय टोळी असण्याची शक्यता आहे. कारण त्यांनी त्यांची जी नावे सांगीतली आहेत त्याचाचतही त्यांचेकडे पुरावे नसुन ते त्यांची नावे खोटी सांगत असावीत असा संशय असुन त्याबाबत त्यांचे कडे पोलीस कस्टडीत अधिक तपास चालू आहे.
सदरची कारवाई ही मा. पोलीस आयुक्त पुणे शहर श्री. रितेश कुमार, मा. सहपोलीस आयुक्त श्री संदिप कर्णी, मा. अपर पोलीस आयुक्त, पूर्व प्रादेशीक विभाग, पुणे शहर श्री रंजनकुमार शर्मा, मा. पोलीस उपआयुक्त परि.-५, पुणे शहर श्री विक्रांत देशमुख, व मा. सहा. पोलीस आयुक्त वानवडी विभाग पुणे शहर सी. पीणिमा तावरे यांचे मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरिक्षक भाऊसाहेब पटारे, पोलीस निरिक्षक गुन्हे संदिप शिवले व तपास पथकातील पोलीस उपनिरिक्षक संतोष सोनवणे, अजय भोसले, पो. अंम, विनोद भंडलकर, अतुल गायकवाड, अमजद पठाण, संतोष नाईक, महेश गाढवे, संदिप साळवे, विष्णु सुतार, राहुल गोसावी, निलकंद राठोड, अमोल गायकवाड, विठ्ठल चोरमले व सोनम भगत यांनी केली आहे.
दाखल गुन्हयाचा अधिक तपास पोलीस उपनिरिक्षक अजय भोसले हे स्वतः करीत आहेत.

