सौ. हनिशा दुधे तालुका प्रतिनिधी बल्लारपूर मो 9764268694
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन चंद्रपूर:- दिनांक १४ एप्रिल रोज शुक्रवारला भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची 132 वी जयंती राजूरा शहरात मोठ्या उत्साहपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली. यावेळी राजुरा येथील सर्व विहारांतील पदाधिकाऱ्यांना धम्म बांधव भगिनीं संविधान चौक राजुरा येथील नागरिक एकत्र येऊन या कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. या कार्यक्रमाच्या सुरुवातीला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अगरबत्ती, मोमबत्ती प्रज्वलित करण्यात आली या नंतर सामूहिक त्रिशरण पंचशील घेण्यात आले.
त्यानंतर यंग मेन्स बुदिस्ट वेल्फेयर असोशियन राजुरा येथील बुद्धविहार बस स्टॉप समोर राजुरा इथे येऊन प्रथम तथागत गौतम बुद्ध आणि बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमाना पुष्पहार अर्पण करून, अगरबत्ती मोमबत्ती प्रज्वलित विमलताई पडवेकर यांचा हस्ते निळ्या ध्वजाचे ध्वजारोहण झाले यानंतर सामूहिक त्रीशरण पंचशील घेण्यात आले. यावेळी मान्यवराचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले महापुरुषाचे कार्य व विचार यांची पेरणा आणि भारतातील बौद्धांच्या वर्तमान काळात कर्तव्य व जबाबदारी या विषयावर किशोर तेलतुंबडे सरचिटणीस भारतीय बौद्ध महासभा चंद्रपूर व सुजाताताई लाटकर केंद्रिय शिक्षिका व महिला उपाध्यक्ष आणि प्रा. सत्यपाल कातकर यांनी वरील विषयावर समाज प्रबोधन केले.
या कार्यक्रमाचे उत्कृष्ट संचालन व आभार प्रदर्शन श्रीहरी करमनकर यांनी केले. या कार्यक्रमाला राजुरा तालुक्यातून धर्मु नगराळे, गौतम चौरे, गौतम देवगडे, भिमराव खोब्रागडे, रमेश रामटेके, डॉ. हरिदास कातकर, उमाकांत धोटे, डॉ.सुमन कातकर, यशोधरा देठे, विलेखा ताई उपरे, तुळसाबाई खडसे, मेघाताई बोरकर शहर अध्यक्ष, किरणताई खैरे कोष्याध्यक्षा, वंदना देवगडे, मालाताई तामगाडगे, प्रणाली ताकसाडे, पडवेकर ताई, निराजने ताई इत्यादी शहरातून बौद्ध बांधवांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती लाभली होती.

