देवेंद्र सिरसाट, हिंगणा तालुका प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणा:- मागासवर्गीय मुलांचे व मुलींचे शासकीय वस्तीगृह वानाडोंगरी यांचे कडून डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३२व्या जयंती निमित्त, गृहपाल रविशेखर राठोड आणि सुनिता कोकोडे तसेच निवासी शाळेचे मु.सुजाता मेश्राम आणि इतर शिक्षक वर्ग यांच्या मार्गदर्शनाखाली भव्य मिरवणूक काढण्यात आली होती, यावेळी वस्तीगृहाच्या मुलं, मुलींनी निळा फेटा व पांढऱ्या रंगाची बंगाली परिधान करून वानाडोंगरी शहरातुन भव्य मिरवणूक काढली लुंबीनी बुध्द विहारात जावून वस्तीगृहाचे कर्मचारी राहुल टेंभरे व विद्यार्थ्यांनी, डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
डिजेवर वाजणाऱ्या भीम गीतांवर विद्यार्थी व विद्यार्थिनी यांनी मनसोक्त नृत्य केले. शहरभर फिरुन वस्तीगृहात मिरवणुकीची सांगता झाली. या कार्यक्रमाचे आयोजन रजत ठेलकर, विक्रांत सिरसाट,साहिल खोब्रागडे, हर्षल रंगारी, प्रज्ञाशिल फुलझेले, प्रफुल वलोकर, संतोष गवळी, आकाश कोचे, साहिल बुग्गेवार, स्वप्नील खंडारे, सुजल मेश्राम, देवबाबू हनवते, विशाल तांडेकर, मुन्ना नागदेवते, कपिल धोंगडे, रविकांत सूर्यवंशी, संकेत भुजाडे, अमन भगत, कांचन सोनुले, प्रतीक्षा नागदिवे, वृषाली शहारे, आचल बनसोड, प्रज्ञा सोनट्टके, साक्षी खैरकर, करिश्मा शेंडे, आस्ता रामटेके, शुष्मा हांडेकर, तनुश्री बागडे, नेहा सोमकुवर, पूजा गजभिये इत्यादींनी केले.

