देवेंद्र सिरसाट, हिंगणा तालुका प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणा:- सन्मान सखी फाउंडेशन च्या वतीने हिंगणा येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या शेतकरी सभागृहामध्ये महिला मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळावा मध्ये सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले त्याचबरोबर विविध साहित्य प्रदर्शनी ही लावण्यात आली होती. सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये समूहनृत्य, एकल नृत्य, उखाणे स्पर्धा, यांच्या आयोजन करण्यात आले होते. ज्यामध्ये महिलांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला विविध स्पर्धेतील विजेते मध्ये शेंद्रे ग्रुप, डोंगरे ग्रुप, बुचे ग्रुप, बोचरे ग्रुप, उखाने स्पर्धेमध्ये रुपाली दिवाने, सविता असावा, एकल नृत्यामध्ये पुजा बावनकर, राजश्री डवरे, पायल येलूरे इत्यादी महिलांनी विजेतेपद नोंदवल.
या महिला मेळाव्याला उद्घाटक म्हणून सहायक पोलीस निरीक्षक हर्षदा भोपाळे, पोलीस उपनिरीक्षक अपूर्वा बोरकर त्यांची उपस्थिती होती. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी श्री संत गमाजी महाराज शिक्षण संस्थेच्या संचालिका अरुणा बंग होत्या तर प्रमुख पाहुणे म्हणून माजी उपसरपंच दिपाली कोहाड, मुख्याध्यापिका सुप्रिया तुपेकर, सविता असावा त्यांची उपस्थिती होती.
या महिला मेळाव्याच्या यशस्वीतेसाठी सन्मान सखी फाउंडेशनच्या अध्यक्ष जोशना खडतकर, सचिव सोनाली झाडे, उपाध्यक्ष कांचन भोपे, कार्याध्यक्ष जयश्री लारोकर, कोषाध्यक्ष ललिता नौकरकर, त्यांनी विशेष परिश्रम घेतले. या कार्यक्रमाचे संचालन उषा ढोक आणि आभार प्रदर्शन ललिता नौकरकर यांनी मानले.

