युवराज मेश्राम विदर्भ ब्युरो चीफ
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपुर:- जिल्हातील ब्राम्हणी येथील तक्षशिला बुद्ध विहार येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 132 वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या निमित्ताणे पंचशील ध्वजारोहण तक्षशिला बुद्ध विहार कमिटीच्या अध्यक्ष आयु. अर्चना उके यांच्या हस्ते करण्यात आले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास समता रॅलीचे मुख्य आयोजक सर्जूभाऊ मंडपे त्याच प्रमाणे भारतीय बौद्ध महासभेचे विदर्भ अध्यक्ष भीमरावजी फूसे यांनी भगवान गौतम बुद्धांच्या पुतळ्यास पुष्पमाला अर्पण केली. तर समता सैनिक दलाचे डिव्हिजनल ऑफिसर विठ्ठल जनबंधू, रिपब्लिकन नेते रामदासजी कापसे भारतीय बौद्ध महासभेचे तालुका सरचिटणीस राहुल वानखेडे, इंजि. प्रकाश पाटील, सामाजिक कार्यकर्ते संजय उके, सिविल कॉन्ट्रॅक्टर सुरेश वाहने, हे प्रामुख्याने उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे संचालन भारतीय बौद्ध महासभा तालुका अध्यक्ष अरुणभाऊ वाहने यांनी केले. कार्यक्रमाचे आभार तक्षशिला महिला मंडळाच्या उपाध्यक्ष लताताई खडसे यांनी केले. या कार्यक्रमाला विशेष करून ललिताताई पाटील, रिपब्लिकन नेते, महाराष्ट्र संदेश न्युजचे विदर्भ ब्युरो चीफ युवराज मेश्राम, ज्येष्ठ समाजसेविका भागाबाई नारनवरे, आंबेडकरवादी सोनालीताई गोंडाणे, महिला मंडळाच्या कोषाध्यक्ष दर्शनाताई झामरे, नंदाताई भंडारे, राजकन्याताई पाटील, सुलोचनाताई वाहने उपस्थित होत्या.
भारतरत्न डॉ. बाबसाहेब आंबेडकर यांची जयंती यशस्वीते करता भारतीताई बनसोड, लोखंडेताई, सुनिताताई गोंडाने, निखिल गोंडाने, आकाश बागडे, दशरथ डोंगरे, नितीन मेश्राम, किशोर गोल्हर, पदमाकर हनवते, नंदकिशोर पाटील यांनी अथक परिश्रम घेतले. दरवर्षीप्रमाणे यंदाही अग्रगामी महिला निधी तर्फे भोजन व सरबतची व्यवस्था केलेली होती.

