मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन अहेरी :-आपल्या ग्रामीण भागातील आदिवासी मुलींमध्ये विविध कला गुण दडलेले आहे. विशेष म्हणजे या भागातील मुलांनी क्रीडा क्षेत्रात लक्ष दिल्यास नक्कीच त्यांना राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर मजल मारण्याची संधी प्राप्त होऊ शकतो. त्यामुळे युवकांनी मोठ्या संख्येने क्रीडा क्षेत्रात पुढे यावे असे आवाहन माजी जि प अध्यक्ष भाग्यश्री ताई आत्राम यांनी केले. ते वेंकटरावपेठा ग्रामपंचायत अंतर्गत येत असलेल्या अबनपल्ली येथे भव्य क्रिकेट स्पर्धेच्या उदघाटन प्रसंगी बोलत होते. यावेळी प्रमुख पाहुणे राष्ट्रवादी काँग्रेसचे अहेरी विधानसभा अध्यक्ष लक्ष्मण येर्रावार, सरपंच समक्का गेडाम, उपसरपंच किशोर करमे, तिरुपती मडावी,बाबुराव तोरेम, महेश,कुसराम, मधुकर चिलनकर, टाटाजी गेडाम गावातील महिला व पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पुढे बोलताना आज क्रीडा क्षेत्रात युवा वर्गासाठी खूप मोठं वाव असून क्रीडा क्षेत्रात अनेकांनी विविध खेळात आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताचे नावलौकिक केले आहेत. ग्रामीण भागात दाखविलेल्या क्रीडा कौशल्यामुळेच त्यांना ती पातळी गाठता आली. त्यामुळे युवकांनी विविध क्रीडा स्पर्धामध्ये नेहमीच सहभाग होऊन आपल्या मधील क्रीडा कौशल्य दाखविन्याचे प्रयत्न करावे असेही त्यांनी आवाहन त्यांनी केले.
माजी जि प अध्यक्ष तथा सिनेट सदस्य भाग्यश्रीताई आत्राम यांचा गावात प्रवेश होताच गावकऱ्यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.त्यानंतर नियोजनानुसार पोचण्णा मडावी यांच्या पटांगणावर स्पर्धेचे उदघाटन करण्यात आले. यावेळी जय गोंडवाना क्रिकेट मंडळ अबनपल्ली चे सदस्य तसेच गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.