ईसा तडवी, जळगाव उपजिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन पाचोरा:- येथीभल संघवी परिवारातील सदस्यांनी पाचोरा शहरातील नागरिकांकरता सुविधा युक्त असे धाम बनवले असून त्या ठिकाणी शहरातील लहान बाळ गोपाळ मंडळी व महिला यांच्याकरिता कुठेतरी विरंगळा वा यासाठी जय किरण धाम तयार केलेल्या एक भव्यदिव्य असे गार्डन स्वरूप देऊन विविध प्रकारचे मुलांना खेळण्यासाठी साधन सामुग्री ठेवून त्या ठिकाणी सर्वांना आनंदमय वातावरण राहील अशी व्यवस्था केलेली आहे त्या धामला जय किरण धाम असे नाव ठेवण्यात आले असून त्या ठिकाणी महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भेट देऊन त्यांचे कौतुक अभिनंदन केले छोट्याशा शहरात खूप चांगले सुविधा युक्त बनवलेले असून संघवी परिवाराला शुभेच्छा दिल्या.
यावेळी माजी मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे त्या ठिकाणी भव्य असा सत्कार करण्यात आला. यावेळी सौ वैशालीताई सूर्यवंशी यांचाही सत्कार करण्यात आला. यावेळी सेनेचे जितेंद्र जैन रमेश बाफना हेही उद्धव ठाकरे यांच्या सोबत होते. यावेळी रतन संघवी, ईश्वर संघवी, हर्षित संघवी, डॉ जव्हारजी संघवी, दिलीप पारख, नेमिचंद बाफना, संजय सिसोदिया, मनोज संघवी, प्रमोद संघवी, प्रसन्नाजी संघवी तसेच सर्व जैन मान्यवर सदस्या च्या उपस्थित कार्यक्रम पार पडले