शेतकऱ्यांच्या सात- बाऱ्यावर निवडणुका घेण्याचा निर्णय जनहितार्थ.
मुकेश चौधरी, कार्यकारी संपादक
हिंगणघाट:- माजी आमदार प्रा.राजु तिमांडे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घेतली भेट. कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुका शेतकऱ्यांच्या सात-बारावर घेतलेला निर्णय जनहितार्थ असून त्यामधील काही अटी रद्द करण्यात याव्या या मागणीसाठी माजी आमदार प्रा.राजू तिमांडे यांनी मुंबई येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन निवेदनाद्वारे मागणी केली. तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व सहकार मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना सुद्धा निवेदन देण्यात आले आहे.
शेतकऱ्याला शेतमाल कुठेही विकण्याची मुभा देण्यात आली असून त्यामुळे पाच वर्षातून ०३ वेळा बाजार समितीमध्ये माल विकण्याची अट रद्द करण्यात यावी. कारण शेतकऱ्यांना शेतमाल विक्रीकरिता पर्यायी पणनची सुद्धा सुविधा आहे.
बाजार समिती मार्फत शासनाकडे सुपर विजन फीच्या माध्यमातून व पणन मंडळाकडे अंशदानाच्या माध्यमातून लाखो रुपये जमा करण्यात येते म्हणून त्या फंडातून निवडणुक खर्चाची तरतूद करण्यात यावी त्यामुळे बाजार समितीवर खर्चाचा बोझा पाहून बाजार समितीमध्ये अस्तित्व टिकून राहण्यास मदत होईल.
कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीचा खर्च बाजार समितीवर टाकण्यात येऊ नये. तरी सरकारने या जाचक अटी रद्द करण्यात याव्या अशी मागणी माजी आमदार प्रा.राजु तिमांडे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना केली आहे.