पंकेश जाधव पुणे ब्यूरो चीफ (7020794626)
वानवडी पोलिस स्टेशन पुणे शहर
महाराष्ट्र संदेश न्यूज ! ऑनलाईन पुणे :- वानवडी पोलीस ठाणे गु.र.नं. १८०/२०२३. मा. दं.वि. कलम ३८०३८५ मधील दि.१५/०५/२०२३ रोजी ते दि.५/०४/२०२३ रोजी चे दरम्यान यातील फिर्यादी यांचे १,१०,०००/- रुपये किंमतीचे दागिणे व रोख रक्कम हे फिर्यादी यांचे वडीलांचे बंगला, घोरपडी पुणे येथील घरी गोदरेजचे लोखंडी कपाटाच्या लॉकर मध्ये ठेवलेले होते ते कोणीतरी अज्ञात चोरट्याने समती शिवाय लबाडीच्या इराधाने स्वतःच्या फायद्या करीता चोरून नेले म्हणुन वानवडी पोलीस ठाणे येथे वक्रार दिल्याने सदर बाबत वरील प्रमाणे गुन्हा दाखल झालेला आहे. सदर गुन्हयाचा तपास पोलीस उप-निरीक्षक संतोष सोनवणे तपास पथक, वानवडी पो.स्टे. हे करत आहेत.
वानवडी पोलीस ठाणे गु.र.नं. १८३/२०२३. मा. दं.वि. कलम ३८०.३८१ मधील फिर्यादी दि. २०/०३/२०२३ रोजी सकाळी ११/०० वा. ते दि. १४/०४/२०२३ रोजी ०७/३० या चे दरम्यान कियादी यांच्या आई वय ८३ वर्षे रा. सदर यानी त्यांचे बेडरुममधील कपाटातील ड्रॉवरमधील कि.रु. १,०८,०००/- सोन्याचे दागिने हे त्यांची नात मयुरी हिचे लग्नामध्ये घालण्यासाठी ड्रॉवरमधुन काढुन कपाटातच वरती एका कप्यात ठेवलेले असताना ते कोणीतरी अज्ञात चोरट्याने त्याचे स्वतःचे फायद्यासाठी लबाडीचे इराद्याने, फिर्यादी व त्यांचे कुटुंबियांचे संमतीविना चोरी करून नेले म्हणुन वानवडी पोलीस ठाणे येथे तक्रार दिल्याने सदर बाबत वानवडी पो.स्टे. येथे गुन्हा दाखल झालेला आहे.
सदर दोन्ही गुन्हयाचे तपासा दरम्यान घोरपडी सोपानबाग वानवडी भागात पेषांतर करून तपास व आरोपीठ यांची गुप्त बातमीदारव्दारे माहिती घेवून तपास पथक अधिकारी व स्टाफ असे यातील संशयीतांचा अतिशय चिकाटीने घेवुन त्यांची ओळख पटवुन खात्री करून, त्यांना ताब्यात घेवुन वानवडी पोलीस ठाणे येथे आणुन त्यांचकडे दाखल गुन्हयाचे अनुशंगाने तपास केला असता त्यांनी दाखल गुन्हा केल्याचे कबुल केल्याने त्यांना दाखल गुन्हयात अटक करुन त्यांचकडे उकृष्टरित्या तपास करून त्यांचेकडुन त्यांनी यातील चोरी केलेले एकूण ४८ ग्रॅम वजनाचे १,९८,०००/- रुपये किं.चे सोन्याचे दागिने तसेच रोख रक्कम २०,०००/- रु असा एकुण २,१८,०००/-रु. किं. चा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलेला आहे.
नमुद आरोपीतांची नावे खालीलप्रमाणे.
१) अमोल किसन शिंदे वय ३५ वर्षे, रा. वसंतदादा फॅक्टरीजवळ, वृंदावन सोसायटी फ्लॅट नं. ४०३ गांजरी, पुणे मुळ पत्ता गलांडवाडी, पारगाव रोड, दौड, पुणे २) ज्योतीधनराज सुर्यवंशी, वय ३७ वर्षे, रा. बी.टी. कवडे रोड, निगडेनगर, गल्ली नं. २, रोकडे यांचकडे मानवाने घोरपडी गांव, पुणे वानवडी पोलीस स्टेशन तर्फे नागरीकाना आहवान करण्यात येते कि, उच्चभु सोसायटयामध्ये घरकामास ठेवताना पोलीस व्हेरीफीकेश करून घ्यावे व आधारकार्ड, पॅनकार्ड, फोटो घ्यावेत.
सदरची कारवाई ही मा. अपर पोलीस आयुक्त, पूर्व प्रादेशीक विभाग, पुणे शहर श्री. रंजनकुमार शर्मा, मा. पोलीस उपआयुक्त परि.-५. पुणे शहर श्री विक्रांत देशमुख व मा. सहा. पोलीस आयुक्त वानवडी विभाग पुणे शहर सी. पौर्णिमा तावरे यांचे मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरिक्षक भाऊसाहेब पटारे, पोलीस निरिक्षक गुन्हे संदिप शिवले व तपास पथकातील पोलीस उपनिरिक्षक संतोष सोनवणे, अजय भोसले पो अंग विनोद मंडलकर, अतुल गायकवाड, अमजद पठाण, संतोष नाईक, महेश गाढवे, संदिप साळवे, विष्णु सुतार, राहुल गोसावी, निलकंठ राठोड, अमोल गायकवाड, विठ्ठल चोरमले व मनिषा सुतार, सोनम भगत यांनी केली आहे

