Monday, February 9, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home क्राईम

गुन्हे शाखा युनिट १ ची उत्कृष्ट कामगिरी..सिगारेट दुकानांच्या घरफोड्या करणारी आंतरराज्यीय चोरट्यांची टोळी जेरबंद

पंकेश जाधव by पंकेश जाधव
April 26, 2023
in क्राईम, पुणे, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र
0 0
0
गुन्हे शाखा युनिट १ ची उत्कृष्ट कामगिरी..सिगारेट दुकानांच्या घरफोड्या करणारी आंतरराज्यीय चोरट्यांची टोळी जेरबंद
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

पंकेश जाधव पुणे ब्यूरो चीफ (7020794626)

युनिट- १ गुन्हे शाखा, पुणे शहर

महाराष्ट्र संदेश न्यूज ! ऑनलाईन पुणे :- दिनांक १६/०४/२०२३ रोजी फिर्यादी यांनी त्यांचे नानापेठ येथील जय अंबे ट्रेडर्स किराणा दुकानाचा पाठीमागचा दरवाजा व लॉक कोणीतरी अज्ञात चोरट्याने तोडुन दुकानाच्या आत प्रवेश करुन ५,०९,३५०/- रुपये किंमतीची सिगारेटची पाकिटे व बॉक्स असा माल चोरून नेलेबाबत दि.१७/०४/२०२३ रोजी समर्थ पोलीस स्टेशन गु.र.नं. ९६ / २०२३, भा.द.वि. कलम ४५४, ४५७,३८० प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.

मा. वरिष्ठांचे मार्गदर्शनाखाली युनिट १ गुन्हे शाखेकडील पोलीस अधिकारी व अंमलदार असे समांतर तपास करीत असताना गुन्ह्यातील घटनास्थळावरील आजुबाजुचे तांत्रिक विश्लेषणाव्दारे तीन आरोपींचे वर्णन निष्पन्न करून सदर आरोपी हे रिक्षा मध्ये बसुन गेल्याचे दिसुन आले. सदर रिक्षाच्या बाहेरील वर्णनावरून सदरच्या रिक्षाचा वडगाव शेरी पर्यंत मागोवा घेतला असता सदर संशयित आरोपी हे साईकृपा हौसींग सोसायटी, वडगाव शेरी पुणे येथे रिक्षातुन उतरल्याचे निष्पन्न केले.

त्यानंतर दि.२५.०४.२०२३ रोजी पोलीस अंमलदार अमोल पवार व आण्णा माने यांनी सदर वर्णनांचे आरोपींचा शोध घेतला असता, सदर तीन आरोपीपैकी एक आरोपी हा साईकृपा हौसींग सोसायटी, वडगाव शेरी पुणे येथे रहात असलेबाबत खात्री केली. सदरची आरोपींबाबतची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक, युनिट १, शब्बीर सैय्यद यांना कळविली असता त्यांनी लागलीच सपोनि आषिश कवठेकर व अंमलदार यांची टीम तयार करून, त्यांना सुचना व मार्गदर्शन करून बातमीचे ठिकाणी जावुन कारवाई करण्याचे तोंडी आदेश दिले. त्यानुसार युनिट एकचे अधिकारी व अंमलदार यांनी सदर ठिकाणी छापा टाकला असता एक इसम मिळुन आला त्यास त्याचा नाव पत्ता विचारला असता त्याने त्याचे नाव १. बुधाराम बियाराम चौधरी, वय ४५ वर्षे, रा. साईकृपा हौसींग सोसा. वडगाव शेरी, पुणे, मुळगांव-रा. राणी वाल, ता. जितारण, जि. पोली, राजस्थान असे असल्याचे सांगितल्याने तो रहात असलेले रुमची झडती घेतली असता त्याचे रूम मधील किचन ओट्या खाली सिगारेटच्या पाकीटांनी भरलेल्या पिशव्या मिळुन आल्या. त्याबाबत सदर इसमाकडे अधिक चौकशी केली असता, त्याने सदर सिगारेटने भरलेल्या पिशव्या च्या त्याचे इतर साथिदारांसह मिळुन नाना पेठ पुणे येथील एका दुकानाच्या मागील बाजुच्या दाराचे लॉक कटावणीच्या सहाय्याने तोडुन सदरचा माल चोरला असल्याचे सांगितले. तसेच आरोपींच्या मोबाईलचे तांत्रिक विश्लेषन केले असता आरोपी बुधाराम चौधरी याचा वावर मंडई परिसरात दिसुन आल्याने त्याच्याकडे त्याबाबत अधिक तपास केला असता गंडई परिसरातील एक सिगारेट विक्रीचे दुकानातून सुध्दा माल चोरला असल्याचे सांगितले.

सदरचा माल हा वरिल गुन्ह्यात गेलेल्या मालापैकी असल्याचे निष्पन्न झाल्याने एकूण ४,१०,०००/- रु. किंवा मुद्देमाल जप्त करून तसा संविस्तर पंचनामा करण्यात आला आहे. त्यानंतर आरोपीचे साथीदार नामे २ रामलाल ढगळाराम चौधरी वय २९ वर्ष ३ महाविर बगदाराम मेघवंशी, वय १९ वर्ष, दोघेही सध्या रा. दत्तवाडी पुणे मुळगांव- रा. राणीवाल, ता. जितारण, जि. पोली, राजस्थान असे आ.क्र. १ ते ३ यांना अटक केले आहे. सदर तिन्ही आरोपींकडुन समर्थ पोलीस स्टेशन गु.र.नं. ९६/२०२३. भा.द.वि. कलम ४५४.४५७.३८० व विश्रामबाग पोलीस स्टेशन पोलीस स्टेशन कडिल एक असे एकूण दोन घरफोडीचे गुन्हे उघडकीस आणुन आरोपी व मुद्देमाल पुढिल कारवाईकामी समर्थ पोलीस स्टेशन यांच्याकडे ताब्यात देण्यात आलेले आहेत.

सदर आरोपी बुधाराम बियाराम चौधरी यावर यापुर्वी पुणे शहरात विश्रामबाग, कोंढवा, समर्थ, हडपसर अशा विवीध पोलीस ठाण्यात घरफोडी, चोरी अशा प्रकारचे एकुण १० गुन्हे दाखल आहेत.

सदरची कामगिरी मा. पोलीस आयुक्त, पुणे शहर, श्री. रितेश कुमार, मा.सह पोलीस आयुक्त, पुणे शहर श्री. संदिप कर्णिक, मा. अपर पोलीस आयुक्त गुन्हे पुणे शहर श्री रामनाथ पोकळे, मा. पोलीस उप- आयुक्त गुन्हे पुणे शहर श्री. अमोल झेंडे, मा. सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे- १ पुणे शहर श्री सुनिल पवार, यांच्या मार्गदर्शनाखाली युनिट १ कडील वरिष्ठ पोलीस निरीक्षकर, शब्बीर सैय्यद, सपोनि आषिश कवठेकर, पोउपनिरी अजय जाधव, सुनिल कुलकर्णी, पोलीस अंमलदार अमोल पवार, आण्णा माने, इम्रान शेख, निलेश साबळे, शुभम देसाई, दत्ता सोनावणे, महेश बामगुडे, विठ्ठल साळुंखे अय्याज दडीकर, अभिनव लडकत, राहुल मखरे शशिकांत दरेकर, अनिकेत बाबर, तुषार माळवदकर यांनी केली आहे.

Previous Post

मेफेड्रॉन (एम.डी.) व गांजा हा अंमली पदार्थ, जप्त करून दोन आरोपींना अटक

Next Post

उच्चभ्रु सोसायटया मध्ये चोरी करणारे नोकर अटकेत वानवडी पोलीसांनी आवळल्या मुसक्या

पंकेश जाधव

पंकेश जाधव

Next Post
उच्चभ्रु सोसायटया मध्ये चोरी करणारे नोकर अटकेत वानवडी पोलीसांनी आवळल्या मुसक्या

उच्चभ्रु सोसायटया मध्ये चोरी करणारे नोकर अटकेत वानवडी पोलीसांनी आवळल्या मुसक्या

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In