पंकेश जाधव पुणे ब्यूरो चीफ (7020794626)
गुन्हे शाखा युनिट २ पिंपरी चिंचवड शहर
महाराष्ट्र संदेश न्यूज ! ऑनलाईन पुणे :- पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालय हटीत वहान चोरांवर कारवाई करणेबाबत वरिष्ठांनी आदेशित केल्याने गुन्हे शाखा युनिट ०२ कडुन वहान चोरांचा शोध सुरु होता. चिचवड पोलीस स्टेशन हदीमध्ये मोरया कॉलनी याठीकाणी फिर्यादि नामे हरीधान बद्रिप्रसाद साहु वय २७ वर्ष, धंदा व्यवसाय रा. मोरश्वर कॉलनी, चिचवडेनगर, चिंचवड पिंपरी, पुणे. याने रात्री त्यांच्या मालकीची शाईन मोटार सायकल घरा समोर पार्क करून ठेवली होती. सकाळी इडुन पाहिले असता त्याची मोटार सायकल मिळून आली नाहि.. मो.सा. MH 14 HZ 7217 हि चोरीस गेल्याचे त्याच्या लक्षात आले त्यांनी गाडी चोरीची तक्रार चिंचवड पोलीस स्टेशन येथे दि. १६/०४/२०२३ रोजी दिली होती.
गुन्हे शाखा युनिट २ चे पोलीस सदर शाईन गाड़ी चोराचा शोध घेत असताना पो हवा जयवंत राऊत व प्रमोद वेताळ यांना शाईन गाड़ी हि दिनेश इंगळे याने चोरल्याचे रोडचे सी.सी.टी.व्हि. कॅमेरे पाहून समजले त्यांनी शाईन गाडी चोराचा माग काढताना आज दि. २४/०४/२०२३ रोजी इसम नाम दिनेश मलकारी इंगळे वय २८ वर्षे चंदा खाजगी नोकरी रा. सी / ओ ओम गुप्ता यांची रूम दुसरा मजला औदुंबर कॉलनी, नक्षत्रम हॉटेल जवळ, वाल्हेकरवाडी, चिंचवड यास त्याचे राहते घराचे पाकग मधुन पोलीस उप-निरीक्षक गणेश माने, पोहवा प्रमोद वेताळ, संतोष इंगळे, जयवंत राऊत, पोना देवा राऊत, सागर अवसरे यांच्या पथकाने सापळा रचुन त्यास ताब्यात घेवून चौकशी केली असता तो उडवा उडवीची उत्तरे देवु लागल्याने त्यास पोलीसी खाक्या दाखविताच त्याने तो राहत असलेल्या घराच्या पाकींगमध्ये चोरलेली शाईन मो.सा. नंबर MH 14 17. 7217 व दि. ०४/०४/२०२३ रोजी मध्यरात्री लिंकरोड चिंचवड येथिल रेल्वे ट्रॅक जवळील श्री सुमन श्री अपार्मेन्ट येथिल पाकींग मधुन हिरो होंडा कंपनीची काळया रंगाची मोटार सायकल तिचा नंबर MH 41 K 6204 हि सुध्दा चोरल्याची कबुली देवुन दोन्ही गाड्या पाकींगमध्ये पार्क केल्याची ठीकाण दाखविली. सदर आरोपी एकडुन ६०,०००/- रुपये कमितिच्या ०२ मोटार सायकल जप्त करून ०२ गुन्हे उघड करण्यात आले.तसेच एका विधी संघर्षित बालकास सपोफी शिवानंद स्वामी, केराप्पा माने यांना १९२३ आतिष कुडके, नामदेव कापसे, पोलीस अंमलदार शिवाजी मुंडे, अजित सानप, उध्दव खेडकर यांनी त्यास ताब्यात घेवून त्यास विश्वासात घेवून त्याचेकडे अधिक चौकशी केली असता त्याने चार दिवसापूर्वी मल्हार गार्डन जवळून नवी सांगवी येथुन एक बजाज ऑटो कंपनीची रीक्षा तिचा नंबर AMIT 12 TU 3041 हि चोरल्याची सांगितले. तसेच एक हीरो होंडा कंपनीची पेंशन मोटार सायकल तिचा नंबर MIT 14 BB 2133 हि टाटा मोटर्स कंपनी पिंपरी येथिल पार्कींग मधून चोरल्याचे कबुली दिल्या अनने त्याच्या कब्जातून ०१ रीक्षा व ०१ मोसा असा एकूण १,६५,०००/- रुपये कीमतिचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून गुन्हे शाखा युनिट ०२ कडुन दोन वेगवेगळया कारवया मधुन ०३ दुचाकी व ०१ रीक्षा अशी ०४ बहाने २,२५,०००/- रुपये कॉमतिचा मुद्देमाल जप्त करुन एकुण वहानचोरीचे ०४ गुन्हे उघड करण्यात आले आहेत.
सदरची कारवाई हि स्वप्ना गोरे, पोलीस उप-आयुक्त गुन्हे शाखा, पिंपरी-चिंचवड, सहाय्यक पोलीस आयुक्त पद्माकर घनवट, गुन्हे शाखा यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट ०२ चे पोलीस निरीक्षक जितेंद्र कदम, पोलिस उप-निरीक्षक गणेश माने, पोहचा प्रमोद वेताळ, संतोष इंगळे, जयवंत राऊत, पोना देवा राऊत, सागर अवसरे, सपोफो शिवानंद स्वामी, केराप्या माने, दिलीप चौधरी, पोना १९२३ आतिष कुडके, नामदेव कापसे, पोलीस शिपाई शिवाजी मुंढे, अजित सानप, उध्दव खेडकर यांच्या पथकाने केली आहे.

