प्रदीप खापर्डे, नागभीड तालुका प्रतिनिधी
मो. न.8329084432
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागभीड:- नगरपरिषद क्षेत्रातील शिवनगर, प्रभाग क्र. 4, नागभीड येथील रहिवाशी सोमा शिवरकर हे 12 मार्च 2023 ला जवळ असलेल्या जंगलात सरपण गोळा करण्याकरिता गेले असता. दबा धरून बसलेल्या वाघाने अचानक त्यांच्यावर हल्ला चढवित व त्यांना ठार केले होते. ज्यामुळे शिवरकर परिवारावर दुःखाचे डोंगर कोसळले आहे. वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी वेळेत येऊन मौका चौकशी केली आणि मृतक सोमा शिवरकर यांच्या मृत्यू पश्चात त्याची पत्नी मीराबाई सोमा शिवरकर यांना चिमूर विधानसभा क्षेत्राचे आमदार बंटीभाऊ भांगडिया यांच्या मार्गदर्शनात भाजपा पदाधिकारी शिरीष वानखेडे मा. नगरसेवक नगर परिषद नागभीड व स्थानिक नागरिक यांचे अथक प्रयत्नांनी त्यांना 10 लाख रुपयाची मदत चेक रूपाने देण्यात आली.
यावेळेस प्रामुख्याने विजय नान्हे, मनोज ठाकरे, हेमंत सेलोकर, राकेश बावणे, जितेंद्र मसराम, रवि देशमुख, रुपेश कडू, सुनील मोरांडे, गोलू साखरकर, प्रविण अमृतकर, नामदेव मांढरे, राहुल देव्हारी, नयन बावनथळे, गंगाधर दडमल, आशिष जीवतोडे, देविदास ठाकरे, सोनू कुंमरे, कुंदन पचारे व अन्य नागरिक उपस्थित होते.