✒️ आशिष अंबादे, वर्धा जिल्हा प्रतिनिधी
8888630841
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन वर्धा: – जिल्हात वाढत क्राईम रेट, अवैध व्यवसाय, दारु, वेश्याव्यवसाय, गुन्हेगारी वर नियंत्रण मिळवण्यासाठी जिल्हा पोलिस अधीक्षक नूरुल हसन हे मागील अनेक दिवसापासून कार्य करत आहे.
नियमित पोलीस ठाण्यातील अधिकारी व कर्मचारी या सोबतच गुन्हे शाखा सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी पार पाडत असते. शिवाय अवैध दारू विक्री रोखण्याची जबाबदारी आहेच, पण वाढत्या दादागिरीला रोखण्यासाठी पोलीस अधीक्षक नूरुल हसन यांनी तिसरा डोळा म्हणून ‘अँटी गँग’ शाखा कार्यरत केली आहे.
या शाखेतील अधिकारी सराईत गुन्हेगारांचा रोज आढावा घेतील. वर्धा शहर व लगतच्या पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गुन्हेगारांवर नजर ठेवल्या जाईल. शेकडो असे गुन्हेगार नजरेखाली असल्याचे समजते. काही अट्टल आपला वचक निर्माण करण्यासाठी शस्त्र मिरवीत कार्यक्रम साजरे करतात. त्यांना ही शाखा कोठडीत आराम करण्यासाठी पाठवणार. एखादा गुन्हेगार संशयास्पद वावरताना आढळून आल्
त्याला ठाण्यात बोलावून खास हजेरी घेतली जात आहे. तऱ्हेवाईक घडामोडींवर नजर ठेवण्याचे काम हिच शाखा करणार आहे.