अनिल अडकिने सावनेर तालुका प्रतिनिधी
मो. नं.-९८२२७२४१३६
सावनेर,२० ऑगस्ट:- खापा पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या वाकी दरबार येथील कन्हान नदीपात्रात महिलेचा बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.
नागपूर वरून वाकी दरबार येथे ताजुद्दीनबाबा यांच्या दर्शना करिता आले असता. दर्शन घेतल्यानंतर ते जवळ असलेल्या कन्हान नदीमध्ये आंघोळीकरीता गेले होते. त्यादरम्यान एका महिलेचा डोहामध्ये बुडून दुर्दैवी मृत्यू झाला.
प्राप्त माहितीनुसार नागपूर येथील जयश्री धर्मेंद्र सोनटक्के राहणार नागपूर वय 45 वर्ष व ऑटो चालक मदन काळे या दोघांनी वाकी दरबार येथील देव दर्शन घेतल्यानंतर जवळ असलेल्या कन्हान नदीवर दोघेही आंघोळीकरीता गेले होते. तेथे गेल्यावर ते एका दगडावर उभे राहून जयश्रींनी म्हटले मी आंघोळ करीत आहे तू तिकडे उभा रहा असे सांगून जयश्री पाण्यात उतरली पाणी जास्त असल्यामुळे ती बुडतच गेली आणि ऑटो चालकाला पोहने येत नसल्यामुळे तो ओरडू लागला. परंतु तिला वाचू शकला नाही. ही घटना आज शनिवारला २ वाजताच्या दरम्यान घडली. या घटनेची माहिती खापा ठाणेदार अजय मानकर यांना करताच ते ताबडतोब वाकीला जाऊन शोध घेत आहे.
मयत महिला जयश्री हिचा शोध अजून पर्यंत लागलेला नसून पुढील तपास पोलीस निरीक्षक अजय मानकर करीत आहे.