अहेरी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुक निकाला नंतर दोघांमध्ये पहिली भेट
मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन गडचिरोली:- मागील आठवड्यात 3मे रोजी बुधवारला गडचिरोलीचे खासदार अशोक नेते आणि आविसं नेते व जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार या दोघांमध्ये भेट झाली असून विशेष म्हणजे गडचिरोलीचे खासदारांनी स्वतः होऊन अजयभाऊ कंकडालवार यांची भेट घेऊन अहेरी विधानसभा क्षेत्रातल्या विविध राजकीय पैलूंवर गुप्त चर्चा केल्याने या दोघांमध्ये झालेल्या भेटीची आणि या भेटीत झालेल्या गुप्त चर्चेमुळे अहेरी विधानसभा क्षेत्रातल्या भाजपचे व्यक्तिनिष्ठ कार्यकर्त्यांमध्ये कहीं खुशी तर कहीं गमचे वातावरण पसरल्याचे दिसून येत आहे.
नुकताच अहेरी कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक पार पडली. या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस व भारतीय जनता पार्टी एकत्रित येऊन अभद्र युती करून निवडणूक लढविली. या निवडणुकीत माजी जि.प.अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांच्या आदिवासी विद्यार्थी संघ (कंकडालवार गटाने) अठरा जागांपैकी अकरा जागांवर कब्जा करत स्वतः दोन्ही जागांवर निवडून येत दोन्ही पक्षाचे अभद्र युतीचे उमेदवारांची पराभव केले. या पराभवाच्या सावटातून भाजपचे व्यक्तीनिष्ठ कार्यकर्ते सावरत असतांनाच गडचिरोलीचे खासदारांनी स्वतः होऊन गडचिरोली येथे आविस नेते अजयभाऊ कंकडालवार यांची भेट घेऊन बाजार समिती विजयाबद्दल त्यांचे अभिनंदन केल्याने. खासदार यांनी पक्ष निष्ठा ऐवजी व्यक्तीनिष्ठा बाळगणाऱ्या कार्यकर्त्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम तर नाही केले ना ? अशी चर्चा मात्र आता सगळीकडे होतांना दिसून येत आहे.
खासदार अशोक नेते व माजी जि.प.अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांच्यामधील गुप्त संवाद हे अद्याप बाहेर पडले नसले तरी खासदारांनी अजयभाऊंच अभिनंदनातून अहेरी विधानसभा क्षेत्रातल्या व्यक्तिनिष्ठानां सावधानतेचा इशारा तर नाही दिले ना ? या भेटीतल्या राजकीय गोपनीयता भविष्यातल्या राजकारणात अहेरी विधानसभा क्षेत्रात नक्कीच दिसून पडेल.
★★★★★★★★★★★★★★★★★★★
आपल्या परिसरातील बातम्या व घडामोडी बघण्याकरीता आजच महाराष्ट्र संदेश न्यूजच्या वेबसाईट www.maharashtrasandesh.com ला भेट द्या. 9766445348/7385445348