✒️आसमा सय्यद, पुणे शहर प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन पुणे:- गेल्या काही महिन्यांपासून पुण्यात कोयता गँगने मोठ्या प्रमाणात दहशत माजवली आहे. त्यात पुण्यातील क्राईम रेट वाढला असल्याचे चित्र दिसून येत आहे. त्यात परत एक अशीच एक हत्या आणि दहशत माजवनारी घटना समोर आली आहे. घर आणि गोठ्याजवळ नशा करत बसलेल्या टोळक्यास हटकल्याने टोळक्याने एकावर कोयत्याने वार करून एकची हत्या केली. ही घटना मुंढवा भगातील केशवनगर येथे घडली. यानंतर गुन्हेगारांची दहशत मोडून काढण्यासाठी मुंढवा पोलिसांनी आरोपींची त्याच परिसरात धींड काढली.
काय आहे घटना….
घर आणि गोठ्याजवळ बसून काही गुन्हेगार प्रवृत्तीचे इसामाची टोळी नशा करत होते. या टोळीला हटकल्याने त्यांनी मिळून कोयत्याने वार करून ज्येष्ठ नागरिक असलेले रवींद्र दिगंबर गायकवाड यांची निर्घृण पने हत्या केली.
पोलिसांनी काढली आरोपीची धींड.
ज्येष्ठ नागरिकाची शुल्लक कारणामुळे हत्या करण्याऱ्या गुन्हेगारांची दहशत मोडून काढण्यासाठी मुंढवा पोलिसांनी त्यांची त्याच परिसरात धींड काढली. याप्रकरणी मुंढवा पोलिसांनी चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. गायकवाड यांचे केशवनगर येथील श्रीकृपा सोसायटीत घर आहे. तेथेच गाई म्हशींचा गोठा आहे. गायकवाड यांच्या गोठ्याजवळ काही तरुण अंमली पदार्थाची नशा करत बसले होते. या आरोपींना आज पोलिसांनी अटक केली आणि त्यांची धिंड काढली.
नागनाथ पाटील, रोहित घाडगे, सनी चव्हाण अशा आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी यासर्व आरोपीला अटक केली आहे. त्यांच्यावर भारतीय दंड संहिता च्या विविध कलमा अन्वये गुन्हे दाखल करून त्यांना बेड्या ठोकल्या आहे.
★★★★★★★★★★★★★★★★★★★
आपल्या परिसरातील बातम्या व घडामोडी बघण्याकरीता आजच महाराष्ट्र संदेश न्यूजच्या वेबसाईट www.maharashtrasandesh.com ला भेट द्या. 9766445348/7385445348

