युवराज मेश्राम नागपुर जिल्हा प्रतिनिधी
नागपूर:- जिल्हातील हिंगणा तालुक्यातील नागलवाडी येथील युवा चेतना मंचचे वर्धापन दिनानिमित्त दहावी व बारावीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा कौतुक सोहळा पार पडला. हिंगणा रायपूर व्यापारी संघटनाचे अध्यक्ष अनिल चानपूरकर, नागलवाडीचे सरपंच रेखाताई लापकले, युवा चेतना मंचचे राष्ट्रीय अध्यक्ष दिलीप दिवटे, सरपंच सेवा संघटनेचे हिंगणा तालुकाध्यक्ष शुभम उडान, पोलिस निरीक्षक संजीवनी बोरकर, व्यापारी संघटनाचे उपाध्यक्ष किशोर बिडवाईक व्यासपीठावर उपस्थित होते. विद्यार्थ्यांनी मिळविलेल्या यशाचे कौतुक करण्यासाठी या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होत.
या सोहळ्यामध्ये नागलवाडी, इंदिरा नगर, वडधामना, वानाडोंगरे येथील योगिता चौधरी, मयुरी गुंजारकर, आचल उमरेडकर, वैभव पाटिल, पूजा पाटिल, वंश निकुडे, आदित्य निकुडे, गौरव चौधरी, मोनाली सहारे, प्रविण सोनेकर, मोहित गुरनुले, निकिता शिवनकर, प्राचि गुरनुले, ईशांत चवरे, चेतन, शेंडे, कृतिका चौधरी, लविका मोहीज, पुजा मोरे, वैष्णवी देशमुख, आयुश चवणे, पायल चवणे, संचित आदे, अशमिन निकुडे, साहीली कोठरूगे, तनुश्री सहारे, निधी डोंगरे, पारुजा पाटिल या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आल.
जिल्हा प्रथिमक शाळा नागलवाडी मध्ये पार पडलेल्या या कौतुक सोहळ्याप्रसंगी 40 गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. या कौतुक सोहळ्याचे संचालन प्राची ताई यांनी तर कार्यक्रमाचे प्रास्ताविक जगदीश वानोडे तर आभार जगदीश वानोडे यांनी मानले. यावेळी कार्यक्रमाला युवा चेतना मंचचे वैष्णवी उडतकर,करूणा ढाकरे, वैष्णवी देशमुख, जगदीश वानोडे, विक्की कैकाडे यावेळी उपस्थित होते.