✒️ आशिष अंबादे, वर्धा जिल्हा प्रतिनिधी
मो. न. 8888630841
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- आज सीबीएसई 10 वी बोर्डाचा निकाल जाहीर झाला त्यात स्कूल ऑफ स्कॉलर्स हिंगणघाट विद्यार्थांनी घवघवीत यश प्राप्त केले. इयत्ता १० वी स्कूल ऑफ स्कॉलर्स हिंगणघाट या शाळेची ही पहिलीच बॅच होती त्यात या शाळेने 100 टक्के निकाल लाऊन सर्व विद्यार्थी उत्तीर्ण झाले.
स्कूल ऑफ स्कॉलर्स हिंगणघाट मधील गोपाल गजरानी या विद्यार्थ्याने ९५.४०% गुण मिळवून शाळेतून पहिला क्रमांक पटकावीला, निर्मल झोटिंग याने ९५% गुण मिळवून दुसरा क्रमांक पटकाविला त्याच प्रमाणे कु. आकांशा चाफले ९३.८०% गुण मिळवून तिसरा क्रमांक पटकावीला. गोपाल गजरानी या विद्यार्थ्याला गणितात १०० पैकी १०० गुण मिळाले आहेत. तर निर्मल झोटिंगला सामाजिकशास्त्र या विषयात १०० पैकी ९८ गुण मिळाले आहेत. सर्व विद्यार्थ्यांचे शाळा प्रशासनाने व मुख्याध्यापिका शिल्पा चव्हाण, प्रशासकीय अधिकारी प्रदीप जोशी, शिक्षण समन्वयक संतोषी बैस आणि संपूर्ण शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
★★★★★★★★★★★★★★★★★★★
आपल्या परिसरातील बातम्या व घडामोडी बघण्याकरीता आजच महाराष्ट्र संदेश न्यूजच्या वेबसाईट www.maharashtrasandesh.com ला भेट द्या. 9766445348/7385445348

