उमेश इंगळे, अकोला जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन यवतमाळ:- जिल्हातील उमरखेड तालुक्यातील बाळदी येथे 2019 मध्ये बुद्ध विहारा समोरील पंचशील ध्वज जातीय भावनेतून काढुन फेकून दिल्या प्रकरणी तत्कालीन ग्रामसेवक, उपसरपंच व पोलीस पाटील यांच्या विरुद्ध पोलिस स्टेशन उमरखेड येथे तक्रार अर्ज दिला होता. पण तत्कालीन उपविभागीय पोलिस अधिकारी व पोलीस निरीक्षक यांनी राजकीय दबावापोटी गुन्हा दाखल केला नाही.
बाळदी येथील सर्व बौद्ध बांधव, महीला व भिम टायगर सेनेचे कार्यकर्ते एक महिनाभर पोलीस स्टेशनला खेटा मारत होते. तेव्हा पोलीस आज, उद्या, परवा, तेरवा गुन्हा दाखल करतो म्हणून टाळाटाळ करत होते. शेवटी एक महीण्यानंतर भीम टायगर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष दादासाहेब शेळके यांना भीम टायगर सेनेचे सिद्धार्थ दिवेकर, श्याम धुळे, कैलास कदम, लिलाबाई हटकर इ.नी फोनवर वरील प्रकरणाची माहिती दादासाहेब शेळके यांना देताच ते तातडीने उमरखेड येथे आले होते. व त्यांनी तात्काळ बाळदी येथील सर्व बौद्ध बांधव महीला व भीम टायगर सेनेचे सिद्धुभाऊ दिवेकर, श्यामभाऊ धुळे, कैलासदादा कदम यांच्यासह दादासाहेब शेळके यानी उपविभागीय पोलीस अधिकारी व पोलीस निरीक्षक यांची उमरखेड जि.यवतमाळ येथे भेट घेऊन त्यांना वरील तक्रारी संदर्भात धारेवर धरले होते व तसेच तुम्हा दोघा पोलीस अधिकारी याना सह आरोपी करण्याचा इशारा देताच वरील आरोपीवर संबंधित पोलीस अधिकारी यांनी तात्काळ गुन्हा दाखल केला होता. सदर गुन्हा दाखल होताच आरोपी फसार झाले होते. वरील सर्व आरोपी आर्थिक दृष्ट्या सक्षम असल्यामुळे ते गुन्हा रद्द करण्यासाठी नागपूर उच्च न्यायालयात गेले होते. त्यामुळे वरील केस संदर्भात उच्च न्यायालयाने आपले म्हणणे मांडण्यासाठी बाळदी येथील फिर्यादीस नोटीस वाट लावली होती. सदरील नोटीस संदर्भातची माहिती दादासाहेब शेळके यांना दिली व त्यांनी तात्काळ उच्च न्यायालयात जाण्यास सांगितले त्यानुसार आज भीम टायगर सेना उमरखेड शहर प्रमुख सिध्दुभाऊ दिवेकर भीम टायगर महीला सेनेच्या उमरखेड तालुका प्रमुख लिलाबाई हटकर व भिम टायगर महीला सेनेच्या कार्यकर्त्या खिल्लारेबाई धुळेबाई यांनी नागपूर उच्च न्यायालयात जाऊन संबंधिताची भेट घेतली व दादासाहेब शेळके यांच्याशी बोलणे करून दिले दादासाहेब शेळके यानी वरील केस संदर्भात सविस्तर माहिती घेतली आहे. आता पुढील न्यायालयीन लढाई सुरू झाली आहे.
★★★★★★★★★★★★★★★★★★★
आपल्या परिसरातील बातम्या व घडामोडी बघण्याकरीता आजच महाराष्ट्र संदेश न्यूजच्या वेबसाईट www.maharashtrasandesh.com ला भेट द्या. 9766445348/7385445348

