अनिल अडकिने सावनेर तालुका प्रतिनिधी
मो. नं.-9822724136
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन सावनेर-12 मे:- आज लागलेल्या सीबीएसई बोर्डच्या 10 व्या वर्गाचा परीक्षेचा निकाल मध्ये सावनेर नगर परिषद अंतर्गत येणाऱ्या श्रीलीला बहुउद्देशीय संस्था चंद्रपूर द्वारा संचालित सावनेर पब्लिक स्कूल गुजरखेडी सावनेर येथील 10 वी सीबीएसई बोर्ड चा निकाल 100 टक्के लागला.
त्यामध्ये प्रथम क्रमांक कु. खुशी वानखेडे 94%, द्वितीय क्रमांक कु.दिव्यांनी धोटे व सम्यक सहारे- 91%, तृतीय क्रमांक आहाना डोंगरे, राजश्री गिऱ्हे व पूर्वा काळे 90% याप्रमाणे या विद्यार्थ्यांनी बाजी मारली. तसेच उर्वरित विद्यार्थी सुद्धा विशेष प्राविण्य श्रेणीत पास करून शहराचे व शाळेचे नाव लोकिक केले.
संस्थेचे अध्यक्ष डॉ. अशोक जिवतोडे, सचिव डॉ. प्रतिभा जीवतोडे, संस्थेचे संचालक रत्नाकर डहाके (पाटील) यांनी गुणवंत विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. तसेच प्राचार्या ममता अग्रवाल, वैशाली देशपांडे,
शिक्षक कोमुजवार सर, जीवतोडे सर, पायल मॅडम, प्रफुल सर, बारापात्रे सर, घुगल मॅडम तसेच
शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी वृंद, पालक वर्ग यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.
★★★★★★★★★★★★★★★★★★★
आपल्या परिसरातील बातम्या व घडामोडी बघण्याकरीता आजच महाराष्ट्र संदेश न्यूजच्या वेबसाईट www.maharashtrasandesh.com ला भेट द्या. 9766445348/7385445348

