अकोला जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन अकोला:- आधार कार्ड अपडेट करण्यासाठी नागरिकांन जवळुन १०० रूपये घेतले जातात आधार कार्ड ही केन्द्र शासनाची योजना असुन पुर्णपणे मोफत आहे तरीही लोकांन कडुन आधार कार्ड अपडेट करण्यासाठी पैसे घेतले जातात ही एकप्रकारे नागरिकांची आर्थिक लूट आहे ही आर्थिक लूट थांबवा अशी मागणी सामाजिक कार्यकर्ता उमेश इंगळे यांनी केली आहे.
केंद्र शासनाच्या माहिती व तंत्रज्ञान मंत्रालयाच्या यूआयडीएआय विभागाने नवीन नियम जारी केले आहे नियमानुसार दहा वर्षांपूर्वी काढण्यात आलेले आधार कार्ड नव्याने अपडेट अर्थात अद्ययावत करणे प्रत्येकाला अनिवार्य करण्यात आले आहे अद्यावत न केलेले आधार कार्ड रद्द करण्यात येणार आहे तरी जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी आधार कार्ड अद्यावत करून घ्यावे असे आपणाकडून(जिल्हाधिकारी) आव्हान करण्यात आले आहे परंतु सदर आधार कार्ड अपडेट म्हणजेच अद्यावत करण्याकरिता बऱ्याच सेतू केंद्रांकडून व इतर आधार कार्ड केंद्रांकडून एका व्यक्ती जवळून शंभर रुपये प्रमाणे पैसे घेतले जातात एक प्रकारे सामान्य नागरिकांची ही आर्थिक लूट आहे म्हणून सदर आधार कार्ड अपडेट करण्यासाठी जो कोणी पैसे घेत असेल त्याच्यावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ता उमेश सुरेशराव इंगळे यांनी जिल्हाधिकारी निमा अरोरा मॅडम यांना दिलेल्या निवेदनाद्वारे केली आहे.
★★★★★★★★★★★★★★★★★★★
आपल्या परिसरातील बातम्या व घडामोडी बघण्याकरीता आजच महाराष्ट्र संदेश न्यूजच्या वेबसाईट www.maharashtrasandesh.com ला भेट द्या. 9766445348/7385445348

