युवराज मेश्राम, विदर्भ ब्युरो चीफ नागपुर,
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपुर:- जिल्हातील कळमेश्वर पासून दोन ते तीन किलोमीटर अंतरावर असलेल्या वरोडा येथील शिवारातील ट्रेनिंग कंपनीला भीषण आग लागल्याची घटना समोर आली आहे. या लागलेल्या भीषण आगीत सर्व मशिन्स सह इतर साहित्य जळून राख झाली आहेत. यात दोन ते तीन कोटी रुपयाचे नुकसान झाल्याचे माहिती मिळाली आहे हि आग शॉट सर्किट मुळे झाल्याचे कंपनीचे मालक अब्दुल लतीफ यांनी सांगितले.
वरोडा शिवारातील कळमेश्वर सावनेर रोडवरील युनिक ट्रेनिंग कंपनी आहे. या कंपनी जवळ शा सर्किट झाल्याने टिनगी पडली जवळच पडून असलेल्या धाग्याने पेट घेऊन बघता बघता भीषण आग लागली. आज लागल्याची माहिती होताच कंपनीत कार्य करणारे कर्मचारी लवकरात लवकर बाहेर निघाले त्यांनी आग विझवण्याकरिता येथील मोठा पंप सुरू केली परंतु शार्ट सर्किट झाल्यामुळे मोटार पंपिंग सुरू करण्यात आली नाही येथील कामगारांनी लगेच इलेक्ट्रिक चालू केल्यामुळे लगेचच मोटार पंप सुरू करण्यात आली आगीवर पाण्याचा मारा करण्यात आला.
आगेची तीव्रता बघता याची माहिती नागपूर महानगरपालिका, कळमेश्वर सावनेर नगरपरिषद येथील अग्निशामक दलाच्या विभागाला देण्यात आली. त्यानंतर अग्निशामक दलाच्या सात गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आणि अग्निशामक दलाच्या जवानांनी सायंकाळी साडेसात वाजता या भीषण आगिवर नियंत्रण मिळविले. याआगीत कच्चा माल व मशीन जडल्याने करोडो रुपयांचे नुकसान झाल्याची माहिती कंपनीचे मालक अब्दुल् लतीफ यांनी दिली. या आगीत कुणालाही इजा झालेली नाही.