शैलेश ओव्हाळ पिपंरी चिंचवड प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन पुणे:- शहरातील प्रभाग क्रमांक ४ खांदवेनगर येथील पिण्याचे पाणी मिळत नसल्यामुळे त्या भागात तीव्र टंचाई निर्माण झाली असून, आज त्यासंदर्भात शिवसेना पक्षाच्या वतीने पुणे महानगरपालिकेच्या मुख्य अभियंता पाणी पुरवठा विभागाचे आधिकारी अनिरुद्ध पावसकर यांना निवेदन देण्यात आले.
उन्हाळा मोठ्या प्रमाणात तापत आहे. त्यात पुणे शहरात पाणी टंचाईत मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याने पिण्याच्या पाण्यासाठी प्रभाग क्रमांक ४ खांदवेनगर येथील नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे. पाण्यासाठी भटकंती सुरू आहे. त्यात खाजगी पाणी टँकर चे भाव हजारोच्या घरात पोहचले आहे. त्यातही खाजगी पाणी टँकर वाल्यांची मुजोरी ही परिसरातील नागरिकांना सहन करावी लागत आहे.
त्यामुळे या पाणी टंचाईच्या परिस्थिती वर लक्ष देऊन परिसरातील नागरिकांना टँकर ने नियमित पाणी पुरवठा करावा या मागणी साठी शिवसेना पक्षाच्या वतीने पुणे महानगर पालिका प्रशासनाला निवेदन देण्यात आले. निवेदन देते वेळी सुनील भाऊ जाधव उपशहरप्रमुख शिवसेना, सचिन भाऊ चव्हाण उपविभागप्रमुख वडगांवशेरी, सुहास फुलचंद कांबळे प्रभाग प्रमुख येरवडा शिवसेना ओम रविंद्र चव्हाण उपविभागप्रमुख युवासेना वडगावशेरी, सुदर्शन राठोड शाखा प्रमुख खांदवेनगर, गोविंदा ठोकरे उपशाखाप्रमुख खांदवेनगर, आर्यन साळवे, अजय भाऊ इंगळे, स्वप्नील इगे इत्यादी सर्व शिवसैनिक उपस्थित होते.

