तिरुपती नल्लालाराजुरा तालुका प्रतिनिधी मो. 98224 77446
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन राजुरा:- तालुक्यातील खामोना गट ग्रामपंचायत अंतर्गत माथरा गावामध्ये वेस्टर्न कोलफील्ड लिमिटेड डब्ल्यूसीएल च्या सामाजिक दायित्व सीएसआर फंडातून जलशुद्धीकरण यंत्र (आरो प्लांट) चे लोकार्पण सोहळा पार पडला. या कार्यक्रमाचे उद्घाटक सब्यसाची डे क्षेत्रीय प्रबंधक होते.
यावेळी आपल्या भाषणात बोलतांना ‘डे’ म्हणाले माथरा गावातील गावकऱ्यांसाठी डब्ल्यूसीएल अंतर्गत जलशुद्धीकरण यंत्राचे लोकार्पण सोहळा पार पडताना मला अतिशय आनंद होत आहे. गावातील लोकांसाठी लोकोपयोगी छोटे-मोठे कामासाठी आमची मदत लागल्यास आम्ही केव्हाही सहकार्य करण्यास तयार असल्याचे सांगितले. गावकऱ्यांनी पण आमच्या नवीन सुरू होणाऱ्या खदानीसाठी सहकार्य करावे असे आव्हान यावेळी केले
या कार्यक्रमाचे अध्यक्ष खामोना ग्रामपंचायतचे सरपंच हरिदास झाडे यांनी आपल्या प्रास्ताविक मध्ये गावाच्या विकासासाठी आम्हाला नेहमी सहकार्य करावे. युवकांचा सर्वांगीण विकास होण्याच्या दृष्टिकोनातून वाचनालय व व्यायाम शाळा देण्यात यावा, असे बोलताना सांगितले. कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी अनिल थुर्वाल आमला अधिकारी सिविल, जी. व्ही. एस. प्रसाद उपक्षेत्र प्रबंधक गोवरी उपक्षेत्र, तोटा मुरली खान प्रबंधक गोवरी डीप खुलीखदान, जी एन व्ही एस श्रीहर्षा उपक्षेत्रीय अभियंता सिविल गोवरी उपक्षेत्र, राजुरा तालुका कृषी उत्पन्न बाजार समिती संचालिका आशाताई झाडे, प्रमुख पाहुणे म्हणून गोयगाव ग्रामपंचायत सरपंच बंडुजी कोडाप, खामोना ग्रामपंचायत सदस्य मारोती चन्ने, सोनीताई ठक, अल्का वैद्य, गावातील प्रतिष्ठित नागरिक वासुदेव पाटील लांडे उपस्थित होते
यावेळी गावातील दिलीप वैद्य, श्रावण विधाते, शंकर पाटील लांडे, मारोती क्षीरसागर, सुरेश वांढरे, रवींद्र लांडे, दिवाकर चहारे, शंकर आत्राम, शरद लांडे, दीपक पहानपट्टे, नानाजी वैद्य, माजी पोलीस पाटील गणपती झाडे, चंद्रकांत पाटील झाडे, बंडूजी टेकाम, सुधाकर ताजणे, अशोक क्षीरसागर, मारोती धोटे, नरेश मुठ्ठलकर, अतुल चहारे, मारोती झाडे, गजानन ताजने, मंगेश काळे, संजय झाडे, मारोती काळे, बापूराव चन्ने, पुंजाराम ठक, सुनंदा मडावी, मीराताई आत्राम, ताई लांडे कार्यक्रमाचे वेळी गावातील ग्रामपंचायत व युवा मंचाचे वतीने सभेसाठी सब्यसाची डे क्षेत्रीय प्रबंधक यांच्या सत्कार करण्यात आला. तसेच कृउबा नवनियुक्त संचालिका आशाताई झाडे यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार सामाजिक कार्यकर्ते प्रदिप बोबडे यांनी केले.
★★★★★★★★★★★★★★★★★★★
आपल्या परिसरातील बातम्या व घडामोडी बघण्याकरीता आजच महाराष्ट्र संदेश न्यूजच्या वेबसाईट www.maharashtrasandesh.com ला भेट द्या. 9766445348/7385445348

