शशांक पाटील, पुणे शहर प्रतिनीधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन पुणे:- शहर पोलीस आयुक्तालय तर्फे पोलीस आयुक्त पुणे शहर सह पोलीस आयुक्त पुणे शहर तसेच अपर पोलीस आयुक्त गुन्हे यांच्या संकल्पनेतून पोलीस पाल्यांसाठी तीन दिवसीय कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती.
या कार्यशाळेमध्ये एकूण ७५ पोलिस दलातील कर्मचाऱ्यांची मुले सहभागी झाली होती या तीन दिवसीय कार्यक्रमांमध्ये पहिल्या दिवशी कार्यक्रमाची सुरवात “होप फॉर चिल्ड्रन यांच्या फाउंडेशन ने प्रत्यक्षिकांमधून मुलांचा सर्वागीण विकास या आगळ्यावेगळ्या कार्यक्रमाने झाली ज्यात मुलांच्या वेगवेगळी कौशल्य विकसित करण्याचे तंत्र शिकवण्यात आले
कार्यशाळेच्या दुसऱ्या दिवशी श्री अनिल गुंजाळ शिक्षणतज्ञ व समुपदेशक यांचे व्याख्यान झाले. त्यामध्ये आनंदाने कसे शिकुया आणि करिअर चे विविध पर्याय याबद्दल मार्गदर्शन केले गेले. ज्ञान प्रबोधिनी प्रशाला पुणे यांच्यातर्फे आठवी ते दहावीच्या मुलांची ॲपटीटयूट टेस्ट घेण्यात आली ही टेस्ट ज्ञान प्रबोधिनी प्रशाला यांनी पुणे पोलीस पाल्यांसाठी विशेष सवलत देऊन उपलब्ध करुन दिली.

तिसऱ्या दिवशी डॉक्टर भूषण शुक्ला चाईल्ड सायकॉलॉजिस्ट यांचे व्याख्यान झाले. त्यांनी इमोशनल इंटेलिजन्स या विषयावर व्याख्यान दिले. यामध्ये मुलांनी स्वतःच्या भावना कशा हाताळायच्या आणि यशस्वी कसे व्हायचे याबाबत त्यांनी मार्गदर्शन केले. त्यानंतर कार्यक्रमाच्या शेवट हा आर्ट ऑफ लिविंग यांच्या मेडिटेशन सत्राने करण्यात आला
या कार्यशाळेत ७५ मुलांनी सहभाग नोंदविला होता कार्यशाळा यशस्वी होण्यासाठ पुणे पोलीस आयुक्तालय यातील अधिकारी व कर्मचारी यांचे सह होम फॉर चिल्ड्रन फाउंडेशन, ज्ञान प्रबोधिनी प्रशाला आर्ट ऑफ लिविंग आणि मान्यवर वक्ते यांचे अतिशय मोलाचे लाभले. या कार्यक्रमांमध्ये पुणे पोलीस आयुक्तालयासह पिनॅकल इंडस्ट्रीज शिवाजीनगर पुणे यांनीही सहकार्य केले होते.
★★★★★★★★★★★★★★★★★★★
आपल्या परिसरातील बातम्या व घडामोडी बघण्याकरीता आजच महाराष्ट्र संदेश न्यूजच्या वेबसाईट www.maharashtrasandesh.com ला भेट द्या. 9766445348/7385445348

