उषाताई कांबळे सांगली शहर प्रतिनीधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन सांगली:- महानगर पालिकेच्या महापौर, आयुक्त, स्थायी सभापती, सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका सांगली यांना निवेदन देण्यात आले दि. १९ मे २०२३ ला महापालिका मधील सादर झालेल्या बजेट मध्ये मागणी केलेली मुद्दे समाविष्ट करून फेरबदल होऊन पुन्हा सादर करण्याची मागणी करण्यात आली.
दि.१९ मे २०२३ ला महापालिकेकडून सादर झालेल्या बजेट मध्ये प्रसारमाध्यमातुन मिळालेल्या माहितीनुसार आपल्या सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका मध्ये स्थायी सभापती यांनी (आठशे अष्ट्याह्तर करोड) ८७८.५५ करोड रूपयाचा बजेट मांडला असुन त्यामध्ये महानगरपालिका क्षेत्रातील रहिवाशी नागरिकांच्या मुलभूत गरजांकडे म्हणावे असे लक्ष दिले गेले नाही. उदाहरणार्थ आरोग्य, शिक्षण, उद्योग व व्यवसाय, महीला सक्षमीकरण, उद्यान पुनरुत्थान, विरंगुळा केंद्र, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र, इत्यादींवर दुर्लक्ष केल्याचे दिसत आहे. त्यामुळे आम्ही महानगरपालिका क्षेत्रातील रहिवाशी नागरीक या नात्याने ह्या प्रसिद्ध केलेल्या बजेट चा विरोध करत असुन आमच्या कडुन काही नवीन सुधारणा व सुचना आपल्या समोर मांडत आहोत यावर पूर्णतः विचार करून त्यांची बजेट मध्ये तरदुत करून नव्याने बजेट सादर करावा अन्यथा आम्हाला महानगरपालिका क्षेत्रातील रहिवाशी नागरीकांना जागरूक करून भारतीय संविधानातील आधिकार समजाऊन जनआंदोलन उभा करून लढा द्यावा लागेल ह्याची सर्वस्वी जबाबदारी हि आपलीच राहील.
आमचे सुधारणा व सुचना पुढील प्रमाणे…
१) शिक्षणातील वाढत्या स्पर्धेत टिकून राहण्याकरीता महानगरपालिका अंतर्गत येणारे शाळा व हायस्कूल आधुनिक तंत्रज्ञान युक्त कराव्यात महानगरपालिका हद्दीतील शाळामध्ये सेमी इंग्रजी शिक्षण पद्धतीला चालना देण्याचे नियोजन करावे ज्या मुळे सर्वसामान्य नागरिकांच्या मुलांना शिक्षणातील वाढत्या स्पर्धेत टिकुन राहुन उच्च शिक्षण घेण्यास मदत मिळेल त्यासाठी लागणाऱ्या निधीची तरतूद करावी.
२) महानगरपालिका क्षेत्रातील रहिवाशी नागरीकांना उदरनिर्वाह साठी रोजगाराची नव – नवीन संधी उपलब्ध करून देण्यासाठी उपाय योजना करण्यात यावेत.
३) मागासवर्गीय वस्ती विकासाठी निधीची तरतूद करून संबंधित निधी मागासवर्गीय वस्ती विकासासाठीच वापरण्यात यावी निधी इतरत्र वळविण्याची पुनरावृत्ती होऊ नये याची काळजी हि घ्यावी अन्यथा निधी मंजूर होऊन सुद्धा मागासवर्गीय वस्ती विकासातुन मागासच राहील.
४) संपुर्ण महानगरपालिका क्षेत्रातील बाजार पेठ ठिकाणी, वरदळीच्या ठिकाणी, प्रभात फेरी साठी जाणारे, व्यायाम करण्याच्या ठिकाणी महिलांसाठी सर्व सोईनीयुक्त (सॅनेटरी पॅड सहीत) स्वच्छतागृह बांधण्यासाठी निधीची तरदुत करावी.
५) महानगरपालिका क्षेत्रातात मोठ्या प्रमाणात विस्तार झालेला असुन बऱ्याच विस्तार भागात घंटागाडी, बंदिस्त गटारी,पिण्याचे पाणी, साफसफाई इत्यादींवर तसेच शहरी भागातील अनेक ठिकाणी पिण्याचे पाणीची टंचाई होत आहे त्यासाठी कायमस्वरूपी उपाय योजना कराव्यात.
६) मिरज शासकीय रुग्णालयासमोरील महात्मा बसवेश्वर महाराज उद्यानाची सुशोभिकरण करून बाजुने होत असलेले अतिक्रमण रोखण्यासाठी मजबुत कंपाऊंड बांधुन तेथे वेगवेगळ्या फुले, झाडे, बसण्यासाठी बाकडे, लहान मुलांना खेळायला विविध साहित्य बसवावे इ. यंत्रणा अद्ययावत करण्यासाठी लागणार्या निधीची तरतूद करावी.
७) महापालिका कडून चालविण्यात येणारी “आरोग्य निधान केंद्र” सांगली च्या धर्तीवर तसेच मिरज व कुपवाड या ठिकाणी सुद्धा व्हावेत.
८) मिरज येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यानात बंद अवस्थेत असलेले टॉय ट्रेन पुन्हा सुरू करण्यात यावेत कारण तिनही शहरात मोजक्याच उद्यान आहेत यात सुद्धा लहान मुलांना विरंगुळा म्हणुन सुरू केलेली ‘टॉय ट्रेन’ सध्या बंद असून गंज खात पडलेले आहे तसेच महापालिका मालमत्ता दुरुस्ती विना खराब होत आहे सदरचे उपक्रम लवकरात लवकर सूरु करावे यासाठी निधीची तरतूद करावी.
९)सांगली आमराई उद्यानात मिरज च्या धर्तीवर टॉय ट्रेन सुरू करावेत यासाठी निधीची तरतूद करण्यात यावेत.
१०)सांगली मिरज कुपवाड शहरमहापालिका परिसरातील सांगली शहरात महात्मा जोतिबा फुले आणि राजश्री छत्रपती शाहूमहाराज यांचे हि पुतळे उभारण्यात यावे तसेच महानगरपालिकेचा असलेला एक अंग कुपवाड शहरा मध्ये स्वराज्याचे जनक छत्रपती शिवाजी महाराज, ज्ञानज्योती महात्मा जोतिबा फुले, आरक्षणाचे जनक राजश्री छत्रपती शाहू महाराज, भारतीय संविधानाचे जनक भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, लोक शाहीर आण्णाभाऊ साठे यांचे पूर्णाकृती पुतळे वेगवेगळ्या चौकात बसवून संबधित चौकास महापुरुषांचे नावे देण्यात यावे.
११) सांगली, मिरज प्रमाणे कुपवाड शहरात सुध्दा चांगल्या दर्जाचे ऊद्यान करण्यात यावे.
१२) सांगली, मिरज शहरा प्रमाणे कुपवाड शहरात जिल्हा व राज्य प्रवास करण्या करीता एस.टि. स्टॅन्ड तयार करण्यात यावे..जेणेकरून सांगली व मिरज येथे बस पकडण्यासाठी जाण्याची वेळ व पैशाची बचत होईल.
१३)सांगली मिरज कुपवाड शहरात खूप मोठा इतिहास आह़े हे पुढील पिढीला कळण्यासाठी जुन्या वस्तूचे संग्रहालय सुरू करावे यासाठी निधीचे तरतूद करावे.
१४)पावसाळा अगोदर नाला साफसफाई करणे साठी निधीचे तरतूद करण्यात यावेत.
१५)महापालिका उपनगरातील भागात बंदिस्त गटारींची व घंटा गाडीची व्यवस्था करण्यासाठी निधीचे तरतूद करावेत.
१६)महापालिका परिसरासाठी अद्ययावत नवीन सुरु होणारे रुग्णालयासाठी जास्तीचे निधी उपलब्ध करून देण्यात यावे जेणेकरून सर्व सामान्य लोकांना आरोग्य सेवेचा उपयोग होईल.
१७) महापालिका परिसरात महाविद्यालय विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र सुरू करण्यात यावेत जेणेकरून नवनवीन अधिकारी निर्माण होतील.
ह्या आमच्या मागण्यावर विचार विनिमय करून योगय निर्णय घेऊन जनसामान्याकडुन कराच्या सवरूपातुन जमा केलेल्या निधी चा योग्य वापर कराल अशी अपेक्षा आहे अशा अनेक मागण्याचे निवेदन देण्यात आले त्यावेळेस संस्थापक अध्यक्ष उमरफारुक ककमरी, उपाध्यक्ष प्रशांत कदम, सचिव अनिल मोरे, खजिनदार अनिस मोमीन, संघटक विज्ञान लोंढे, संजय कांबळे आदी उपस्थित होते.

