संदिप सुरडकर नागपुर जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपुर:- शहरातून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. शहरातील लकडगंज परिसरात क्रिकेट सट्टयामुळे एक संपूर्ण परिवार उद्दवस्त झाला आहे. त्यात मुलाने गळफास लावून आत्महत्या केली तर आईने विष प्राशन करून आपली जीवन यात्रा संपवली आहे. या घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
क्रिकेट वर सट्टयावर मोठ्या प्रमाणात पैसे हरल्यामुळे आर्थिक फटका बसलेल्या एका वीस वर्षीय तरुणाने नैराश्यातून आत्महत्या केली. दुर्दैवाच बाब म्हणजे मुलाच्या मृत्यूची बातमी एकताच त्याचे आईने देखील काही तासातच विष प्राशन करुन मृत्यूला जवळ केले आहे. नागपुर शहरातील लकडगंज पोलीस स्टेशनच्या हद्दीत येणाऱ्या छापू नगर परिसरात या घटनेमुळे प्रचंड हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. खितेन नरेश वाधवानी वय 20 वर्ष असे मृत मुलाचे नाव असून दिव्या नरेश वाधवानी असे त्याच्या आईचे नाव आहे.
खितेन नरेश वाधवानी हा नागपुरातील नामांकित महाविद्यालयाचा विद्यार्थी होता. परंतु चुकीच्या संगतीला लागल्यामुळे तो क्रिकेट वर सट्टा खेळायला लागला. मागील वर्षी तो आयपीएलमध्ये काही पैसे हरला होता. ही बाब त्याने घरच्यांना सुद्धा सांगितलं होते. त्याच्या वडिलांनी ते हरलेले पैसे तेव्हा दिले पण होते मात्र त्याने यावर्षी परत मित्रांच्या सांगण्यावरुन आयपीएल सट्टयावर पैसे लावू लागला.
दि. 20 मे शनिवारी खितेन हा मध्यरात्री उशिरा घरी आला, उशिरा घरी आल्यामुळे त्याची आई त्याच्यावर चिडली आणि रागवल होत. या घटनेच्या दुसऱ्या दिवशी संपूर्ण कुटुंब शहरातील आशीर्वाद नगर इथे नातेवाईकाच्या घरी लग्न समारंभासाठी गेले होते. दरम्यान, घरात कोणीही नसल्याने खितेनने घरातील स्वयंपाकघरात गळफास घेऊन आत्महत्या केली. यानंतर कुटुंबीय घरी परतले असता त्यांना खितेन स्वयंपाकघरात लटकलेल्या अवस्थेत आढळला. त्याला तातडीने रुग्णालयात नेण्यात आलं, मात्र तोपर्यंत त्याचा मृत्यू झाला होता.
48 तासांत आईने पिल विष..
आपल्या मुलाच्या मृत्यूच्या 48 तासांनंतर त्याची आई दिव्या नरेश वाधवानी यांनी देखील विष प्राशन करुन आपलं आयुष्य संपवलं. तिला रुग्णालयात दाखल करण्यात आलं, मात्र डॉक्टरांनी तपासणीनंतर आईला मृत घोषित केलं. आपण मुलाला ओरडल्यामुळे त्यामुळे त्याने आत्महत्या केली असावी अशा पश्चाताप झाल्याने आईने विष पिऊन आयुष्य संपवलं.

