उषाताई कांबळे, सांगली शहर प्रतिनीधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन जयसिंगपूर:- येथे भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळा योग्य ठिकाणी बसविण्यात यावा म्हणून सोमवार, दि.29 मे 2023 रोजी नगरपरिषदेवर हल्लाबोल मोर्चा काढण्यात येणार आहे.
यावेळी आंदोलन कर्त्यानी सांगितले की, जयसिंगपूर मध्ये मुतारीच्या बाजूस स्टँड परिसरात जगातील प्रख्यात ज्ञानपंडित, भारतीय घटनाकार, विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा बसविणे किती योग्य आहे? तसेच हा स्टँडचा परिसर मद्यपींचा अड्डा आहे. मग स्टँडचीच जागा का? निवडण्यात आली डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा बसविण्यासाठी? बाबासाहेबांचा पुतळा जर बसवायचा असेल तर तो सन्मानानेच योग्य जागेत बसला पाहिजे. यासाठीची योग्य जागा म्हणजे जुने न्यायालय (सि.स.नं. 1251). सध्यस्थितीला न्यायालय तेथून नवीन जागेत स्थलांतरीत झाले आहे. ती वास्तू बंद स्थिती आहे. रेकॉर्ड रूमही स्थलांतरीत होत आहे. महत्वाचे म्हणजे ही जागा शासकीय म्हणजे सरकारच्या मालकीची आहे. तसा प्रॉपर्टी कार्डवर उल्लेख आहे. याच रास्त मागणीसाठी 3 तारखेची सन्मान रॅली जिल्हाधिकारी कार्यालयावर काढण्यात आली. त्यावेळी सि.स.नं. 1251 (जुने न्यायालय) या ठिकाणी पुतळा बसविण्या करिता समाजाची आग्रही मागणी आहे, असे जिल्हाधिकार्यांनी मान्य करून यासंबंधित ठराव/प्रस्ताव स्थानिक जयसिंगपूर प्रशासनाकडून पाठविण्यात यावा असे सूचविले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा मुतारीच्या बाजूस बसविला गेला तर विटंबना होणार नाही का? ही भविष्यात होणारी विटंबना थांबविण्या साठी आणि योग्य ठिकाणी विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा पुर्णाकृती पुतळा सन्मानाने बसविण्यासाठी जयसिंगपूरमध्ये सोमवार, दि.29 मे 2023 रोजी नगरपरिषदेवर सि.स.नं. 1251 मध्ये पुतळा व्हावा या मागणी साठी हल्लाबोल मोर्चा काढण्यात येणार आहे. तरी या मोर्चास संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्यातून पर्यायी महाराष्ट्रातून बहुजन व बौध्द समाजाने उपस्थित दर्शविली पाहिजे असे यावेळी सांगितले.
विटंबना झाल्यावर रस्त्यावर येण्यापेक्षा विटंबना होण्याआधीच रस्त्यावर येण्याची आता गरज आहे. सर्व नागरिकांनी या मोर्चास मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले आहे.
★★★★★★★★★★★★★★★★★★★आपल्या परिसरातील बातम्या व घडामोडी बघण्याकरीता आजच महाराष्ट्र संदेश न्यूजच्या वेबसाईट www.maharashtrasandesh.com ला भेट द्या. 9766445348/7385445348