पंकेश जाधव पुणे ब्यूरो चीफ 7020794626
वाकड पोलीस स्टेशन पिंपरी चिंचवड शहर
महाराष्ट्र संदेश न्यूज ! ऑनलाईन पुणे :- इसम नामे मंदार सुनिल कुरो, वय २५ वर्षे धंदा नोकरी, रा. नानूभाई देसाई रोड, गिरगाव, मुंबई ४ हे त्यांचा मित्राचे नातेवाईकांमध्ये मयत झाल्याने अस्थिविसर्जनासाठी काळवाडी येथे आले होते. दिनांक २५/०५/२०२३ रोजी ००:३० वा. चे सुमारास ते राहुल रेस्टॉरंट कोटेश्वर पेट्रोलपंपासमोर काळेवाडी येथे जेवणाची पार्सल ऑर्डर घेण्यासाठी बाहेर थांबले असताना ५ ते ६ अनोळखी इसमांनी अचानक त्यांचे जवळ येऊन कोणत्यातरी अज्ञात कारणावरुन त्यांचेवर जिवे ठार मारण्याचे उद्देशाने हल्ला करत त्यांचं डोक्यात कोयत्याने वार केला. फिर्यादी यांचेवर डिवाय पाटोल हॉस्पीटल, पिंपरी येथे दवाउपचार सुरु असताना त्यांचे नोंदविलेल्या जबाबावरुन वाकड पोलीस ठाणे गु.र.नं. ५०३ / २०२३ भादंवि कलम ३०७,५०४,१४१,१४३,१४४,१४७, १४८, १४९ आम अॅक्ट ४.२५ महा. पो. का. क. ३७(१) (३) सह १३५ क्रिमीनल अॅमेंटमेंट अॅक्ट ३,७ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दाखल गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन मा. श्री. विनयकुमार चौबे सो पोलीस आयुक्त, पिपरी चिंचवड यांनी अनोळखी आरोपींचा शोध घेऊन गुन्हा उघड करण्यास आदेशीत केले. त्या अनुषंगाने मा. श्री. गणेश जवादवाड, वरिष्ठ पोलीस निरीक्षक वाकड पोलीस ठाणे यांनी त्यांचे अधिनस्थ असलेल्या तपास पथकाकील सपोनि संतोष पाटील, पोउपनि सचिन चव्हाण यांचे दोन वेगवेगळे तपास पथक तयार करून आरोपी तात्काळ अटक करणेबाबत सूचना दिल्या.त्याप्रमाणे सपोनि संतोष पाटील व पोउपनि सचिन चव्हाण यांची गुन्हे प्रकटीकरण पथकाची वेगवेगळी पथके तयार केली. फिर्यादीकडे अधिक चौकशी केली असता असे समजले की, फिर्यादी हे त्यांचे मित्रासोबत त्याचे दाजी नामे ज्ञानेश्वर महा बोरकर, रा. ज्योतीबानगर, काळेवाडी यांचेकडे आले होते. दिनांक २४/०५/२०२३ रोजी अस्थिविसर्जन झाल्यानंतर ज्ञानेश्वर बोरकर यांचे मित्र मोहन धंदे, बिट्टू ऊर्फ संघर्ष चंदनशिवे असे सर्व कामानिमीत्त एकत्रित फिरले होते. काही दिवसापूर्वी व ऊर्फ संघर्ष चंदनशिवे यांचे वडीलांना दक्षिण भारतीय मुलाने किरकोळ कारणावरून धक्काबुक्की केली होती. सदर दक्षिण भारतीय मुलगा व त्याचे सोबतच यांचा तापकीर चौक काळेवाडी येथे इडली डोसा विकण्याचा व्यवसाय आहे. दिनांक २४/०५/२०२३ रोजी रात्रौ १०:३० वा. चे सुमारास बिट्टू ऊर्फ संघर्ष चंदनशिवे याने सदर दक्षिणभारतीय मुलास त्याच्या वडीलांना धक्का बुक्की केलेबाबत जाब विचारला व योग्य तो समज दिली होतो. त्यामुळे त्याचा राग मनात धरून दक्षिण भारतीय ५ ते ६ इसमांनी कोटेश्वर पेट्रोलपंपासमोर येऊन बिट्ट ऊर्फ संघर्ष चंदनशिवे याचा शोध घेत असताना फिर्यादी तेथे उभे असल्याचे पाहून व फिर्यादी बिट्टू ऊर्फ संघर्ष चंदनशिवे यांचे सोबत फिरताना त्याने पाहिले असल्याने फिर्यादी यांचा गंभीर दुखापत केल्याचे निष्पन्न झाले.
आरोपीचा तांत्रिक व पारंपारीक पध्दतीने शोध घेत असताना आरोपी नामे अरुमुगम सुब्बवाह वय २५ वर्ष रा. जगताप नगर, डी मार्टचे मागे कल्पना कावळे यांचे खोलीत भाडयाने घेरगाव पुणे मुळ रा.४९ पील्लायर कोकील रोड, मलुकाकुरांची, तिरुनलबेली राज्य तमिळनाडु यास थेरगाव मधून अटक करण्यात आली. त्यावेळी त्याचे ताच्यात ०२ किलो २५ ग्रॅम गांजा मिळून आल्याने वाकड पोलीस येथे गु.र.नं. ५०४/२०२३, एन.डी.पी.एस. अॅक्ट कलम ८ (क), २०(ब) (ii) (ब) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे; तसेच बाकी आरोपींचा शोध घेत असताना अशी माहिती मिळाली की आरोपी काळेवाडी येथून पळून जाऊन कोठेतरी लपून बसले आहेत. बातमीदारातर्फे माहिती मिळाली की, आरोपी औध येथे लपून बसले आहेत. मिळालेल्या माहितीप्रमाणे सापळा रचून शिताफीने ०५ आरोपीना ताब्यात घेतले असता त्यांचे नावे १) शंकर अरुनाचलम, वय २५ वर्ष, रा. १६५, उरुयकल स्ट्रीट, मरुकलकुरची, तिरुनेलवेल्ली, तामिळनाडु पिन- ६२७१०८ २) रमेश अरुनाचलम, वय २८ वर्षे, रा. १६५, उरुडॅयकल स्ट्रीट, मरुकलकुरची, तिरुनेलवेल्ली. तामिळनाडु पिन- ६२७१०८ ३) वानमा मलाई मुख्यया, वय १९ वर्षे, रा. २०९, आय्यन कोवील स्ट्रीट, मरुकलकुरची, तिरुनेलवेल्ली, तामिळनाडू ४) इसकीपांडी सुव्वलह, वय २२ वर्षे, रा. ४९,पिल्लाया कोवील, साऊथ स्ट्रीट, मरुफलकुरची, तिरुनेलवेल्ली, तामिळनाडू ६२७१०८ ५) मायाकन सुत्रमणी वय २० वर्षे, रा. चलेव, मरुकलकुरची, तिरुनेलवेल्ली, तामिळनाडु सदर आरोपी यांना गुन्ह्यात अटक करण्यात आली आहे. दाखल गुन्ह्याचा पुढील तपास राजेश मासाळ, पोलीस उप निरीक्षक, बाकड पोलीस ठाणे करीत आहेत. अटक ०६ आरोपीपैकी ०४ आरोपीच्या वर तिरुनेलवल्ली, तामिळनाडु येथे गंभीर गुन्हे दाखल असून आरोपी शंकर अरुनाचलम वाचेवर १६ गुन्हे, आरोपी वानमामलाई मुख्यया याचेवर ०७ गुन्हे, आरोपी इसकीपांडी सुब्बलह याचेवर १५ गुन्हे व आरोपी अरुमुगम सुब्याह याचेवर ०६ गुन्हे असे भादंवि कलम३०२,३०७,३९९,३९७,३८७ आर्म अॅक्ट प्रमाणे गंभीर गुन्हे दाखल आहेत. आरोपी यांचे मूळ गावी दोन गटात वैमनस्य असून त्यातूनच गुन्हे दाखल असून सदर वैमनस्यामध्ये संरक्षण मिळण्यासाठी पुणे येथे राहून इडली डोसाचा व्यवसाय करीत असल्याचे निष्पन्न झाले आहे.
सदरची कारवाई मा. श्री. विनयकुमार चौबे सो, पोलीस आयुक्त, पिंपरी चिचवड, मा. श्री. डॉ. संजय शिंदे सो सहपोलीस आयुक्त, मा. श्री. वसंत परदेशी, अपर पोलीस आयुक्त, मा. श्री. डॉ. काकासाहेब डोळे सो, पोलीस उप आयुक्त, परि-२, पिपरी चिंचवड, मा. श्री. पद्माकर घनवट, सहा. पोलीस आयुक्त सो, देहुरोड विभाग, पिंपरी चिंचवड यांचे मार्गदर्शनाखाली मा. श्री. गणेश जवादवाड, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, मा. श्री. रामचंद्र घाडगे पोलीस निरीक्षक गुन्हे-२, सपोनि संतोष पाटील, पोउपनि सचिन चव्हाण, पोउपनि राजेश मासाळ, सपोफी विभोषण कन्हेरकर, सपोफी बाबाजान इनामदार, सपोफी. राजेंद्र काळे, पोहवाबंदु गिरे, पोहवा संतोष वर्ग, पोहवा स्वप्निल खेतले पोहवा. अतिश जाधव, पहवा.प्रमोद कदम, पोहवा. संतोष महाजन, पोना, अतिक शेख, पोना. विक्रांत चव्हाण, पोना प्रशांत गिलवीले, पॉशि. अजय फल्ले, पोशि तात्या शिंदे, पोशि स्वप्निल लोखंडे, पोशि सौदागर लामतुरे, पोशि विनायक घारगे, पोशि रमेश खेडकर, पोशि, कौलेय खराडे, पोशि भास्कर भारती, तसेच परिमंडळ-०२ कडील पोशि पंडीत यांनी मिळून केली आहे.

