Sunday, February 8, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home क्राईम

बहिणीची अश्लील चित्रफित समाज माध्यमावर व्हायरल केल्याने भावाने केला बहिणीच्या प्रियकराचा खून.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
May 31, 2023
in क्राईम, नागपुर, महत्त्वाच्या बातम्या, विदर्भ
0 0
0
बहिणीची अश्लील चित्रफित समाज माध्यमावर व्हायरल केल्याने भावाने केला बहिणीच्या प्रियकराचा खून.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

संदिप सुरडकर नागपुर जिल्हा प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपुर:- शहरातून एक खळबजनक घटना समोर येत आहे. एका युवकाने एका तरुणीशी शारीरिक संबंध प्रस्थापित करून तिची अश्लील चित्रफित तयार करून राहणाऱ्या परिसरातील वस्तीतील व्हॉट्सअप ग्रूपवर ती चित्रफित व्हायरल केली.

राहत असलेल्या परिसरात ही चित्रफित व्हायरल झाल्याने मोठ्या प्रमाणात बदनामी झाल्याने चिडलेल्या तरुणीच्या भावाने बहिणीच्या प्रियकराची निर्घृण हत्या केली. ही थरारक घटना गिट्टीखदान येथे मंगळवारी भरदुपारी घडली. कपील डोंगरे वय 37 वर्ष गंगानगर, गिट्टीखदान असे हत्या करण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव आहे.

कपील डोंगरे हा अविवाहित असताना त्याचे वस्तीतील एका युवतीसोबत प्रेमसंबंध होते. दोघांनी लग्न करण्याचे ठरविले होते. मात्र, दोघांच्याही कुटुंबियांचा विरोध होता. त्यामुळे त्यांचे लग्न होऊ शकले नाही. दरम्यान, त्या युवतीचे दुसऱ्या एका तरुणासोबत लग्न झाले. कपिलनेही बालाघाटमधील तरुणीशी लग्न केले. दोघांचाही संसार चांगला सुरु होता. दरम्यान कपीलने गिट्टीखदानमध्ये मोबाईल शॉप टाकले होते. गेल्या काही दिवसांपूर्वी कपील हा रायपूरला गेला. तेव्हा त्याने विवाहित प्रेमिकेला फोन केला. तिला भेटायला एका हॉटेलमध्ये बोलावले. तेथे त्यांनी शारीरिक संबंध प्रस्थापित केले. त्यावेळी कपीलने शरिरसंबंधाची क्लीप बनविली.

काही दिवसांपूर्वी कपील सोबत दुसऱ्याच तरुणीचे नको त्या अवस्थेत मोबाईलमध्ये फोटो दिसल्याने कपिलची पत्नी संतापली. त्यावरून पती-पत्नीत खटके उडू लागले. कपिलकडून नंबर घेऊन पत्नीने त्या तरुणीला फोन लावून तिची खरडपट्टी काढली. कपीलच्याही कुटुंबियांना त्याच्या विवाहबाह्य संबंधाची माहिती देऊन मोठा वाद घातला. दरम्यान, नातेवाईकांनी तिची समजूत घालून प्रकरण शांत करण्याचा प्रयत्न केला. मात्र, ती मानायला तयार नव्हती. तिने पतीच्या मोबाईलमधून प्रेमिके सोबतचे काही अश्लील छायाचित्र आणि चित्रफीती काढल्या आणि वस्तीतील ओळखीच्या व्यक्तींच्या एका व्हॉट्सअप ग्रूपवर त्या व्हायरल केल्या. त्यामुळे त्या तरुणीसोबत तिच्या कुटुंबिुयांचीही वस्तीत बदनामी झाली. हा प्रकार असह्य झाल्याने तरुणीच्या भावाने कपिलला जाब विचारला. त्यावरून त्यांच्यात वाद झाला आणि तरुणाने मंगळवारी दुपारी आधी कपिलवर लाकडी दांड्याने हल्ला चढवला नंतर त्याला दगडाने ठेचून त्याची हत्या केली.

स्वत:च पोलीस स्टेशन मध्ये पोहचला…
बहिणीच्या प्रियकराची हत्या केल्यानंतर आरोपी स्वत:च पोलीस स्टेशन मध्ये जाऊन तेथे त्याने हत्येच्या घटनेची माहिती देऊन स्वत:ला अटक करवून घेतली. दरम्यान, या घटनेमुळे गिट्टीखदानमध्ये प्रचंड थरार निर्माण झाला आहे.

Previous Post

नागपूर येथील संविधान चौक येथे प्रबोधनात्मक कार्यक्रम हजारो नागरिकांची उपस्थितीत उत्साहात संपन्न.

Next Post

नागपूर: ‘तू मला खूप आवडतेस’ असे बोलून शेजारी राहणाऱ्या 24 वर्षीय महिलेवर घरात घुसून तीन दिवस लगातार बलात्कार.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
नागपूर: ‘तू मला खूप आवडतेस’ असे बोलून शेजारी राहणाऱ्या 24 वर्षीय महिलेवर घरात घुसून तीन दिवस लगातार बलात्कार.

नागपूर: 'तू मला खूप आवडतेस' असे बोलून शेजारी राहणाऱ्या 24 वर्षीय महिलेवर घरात घुसून तीन दिवस लगातार बलात्कार.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In