संदिप सुरडकर नागपुर जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपुर:- नागपुर शहरात क्राईम रेट मोठ्या प्रमाणात वाढत असल्याचे मागील अनेक घटनावरून समोर येत आहे. त्यात चोरी, हत्या, बलात्कार, फसवणूक या घटना घडत आहे.
नागपूर शहरातील गिट्टीखदान पोलीस स्टेशनच्या हद्दीत एका नराधमाने आपल्या घरा शेजारच्या महिलेच्या घरात घुसून बलात्कार केला. ही घटना 26 मे रोजी रात्री 10 वाजतापासून ते 28 मे रोजी पहाटे 4 वाजताच्या दरम्यान भिवसेनखोरी परिसरात घडली. संजय रामचंद्र डोंगरे वय 35 वर्ष असे आरोपीचे नाव आहे.
प्राप्त माहितीनुसार, नराधम आरोपी संजय रामचंद्र डोंगरे याची पत्नी त्याला सोडून आपल्या मुलीसोबत वेगळी राहते. दोन वर्षांपूर्वी त्याच्यावर विनयभंगाचा गुन्हाही दाखल आहे. तक्रारदार ही 24 वर्षीय महिला त्याच्या घराजवळ राहते. काही दिवसांपूर्वी महिलेचा पतीसोबत वाद झाला. यामुळे तिचा पती आई-वडिलांकडे राहायला गेला. शुक्रवारी 26 मे रोजी रात्री 10 वाजताच्या सुमारास महिला घरात एकटीच होती. दारू पिऊन संजय तिच्या घरी गेला. ‘तू मला खूप आवडतेस’ असे सांगून जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले. कोणाला काही सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी दिली. दुसऱ्या दिवशी 27 मे रोजी रात्री आरोपीने महिलेला धमकावून आपल्या घरी जेवणासाठी बोलावले. तेथेही महिलेला धमकी देऊन तिच्यावर बलात्कार केला. रविवारी 28 मे रोजी पहाटे 4 वाजता ही महिला आरोपीच्या घरातून बाहेर पडण्यात यशस्वी झाली. तक्रारदार महिलेच्या तक्रारीवरून गिट्टी खदान पोलीस स्टेशनचे एपीआय जी. कंकाळ यांनी आरोपीविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.

