उषाताई कांबळे, सांगली शहर प्रतिनीधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन सांगली:- जिल्हातून एक खळबळ उडवून देणारी माहिती समोर येत आहे. येथील इनाम धामणी ग्राम पंचायतच्या तीन सदस्यांनी मालमत्तेच्या थकीत कर न भरलेने या ग्रामपंचायत सदस्य वर जिल्हाधिकाऱ्यांनी अपात्रतेची कारवाई केलेली आहे. त्यात इनाम धामणी ग्रामपंचायत सदस्या 1 ललिता दीपक परीट, 2 राजमती प्रकाश मगदूम, 3 विजया बाळासाहेब कोळप यांचे वर कार्यवाई करणेत आलेली आहे.
या तीन सदस्यांनी ग्रामपंचायतचा थकीत कर न भरल्याने समाजिक कार्यकर्ते प्रमोद मल्लाडे यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार नोंदवत या सदस्यावर कार्यवाहीची करण्याची मागणी केली होती. त्यामुळे जिल्हाधिकारी यांनी या प्रकरणी शहानिशा करून योग्य तो निर्णय दिला आणि तीन ग्रामपंचायत सदस्यांना अपात्र ठरविण्यात आले.
जिल्हाधिकारी यांच्याकडे प्राप्त झालेल्या तक्रारीच्या अनुषंगाने सांगलीचे जिल्हाधिकारी राजा दयानिधी यांनी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी, मिरज पंचायत समिती चे गटविकास अधिकारी, ग्राम पंचायतीचे ग्रामसेवक यांना अहवाल मागवीला होता. या अहवालामध्ये ग्रामपंचायत चे तीन सदस्य यांनी ग्रामपंचायतचा थकीत कर न भरल्याचे नमूद केले होते. या सदस्या वर संबंधित कार्यवाहीची 10 दिवसाची नोटीस प्रशासना मार्फत बजावण्यात आली होती तरी देखील वेळेत कर भरला नाही. त्यामुळे अखेर महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम १९५८ अन्वये. (१४) ह १६ (२) नुसार इनाम धामणी ग्राम पंचायत च्या तीन ही सदस्याना अपात्र ठरवन्यात आले. या कार्यवाईमुळे ग्रामपंचायत मध्ये व गावात खळबळ उडाली आहे.
आपल्या परिसरातील बातम्या करीता आजच संपर्क साधावा. प्रशांत जगताप 9766445348- 7385445348