सौ. हनिशा दुधे बल्लारपूर तालुका प्रतिनिधि
चंद्रपूर दि.23 ऑगस्ट:- जिल्ह्यात खरीप हंगाम 2022 अंतर्गत दी विदर्भ को – ऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशन लिमिटेड या नोडल संस्थेमार्फत युरीया खताचा 3208 मेट्रीक टन संरक्षित साठा करण्यात आला होता. जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांच्या सुचनेनुसार यापूर्वी खरीप हंगामासाठी संरक्षित असलेला 1208 मेट्रीक टन युरीया आणि 650 मे. टन डीएपी साठा मुक्त करण्यात आला. खरीप हंगाम रासायनिक खत संरक्षित साठा कालावधी 31 ऑगस्ट 2022 ला संपत आहे. त्यामुळे जिल्हास्तरीय रासायनिक खत सनियंत्रण समितीचे (संरक्षित साठा) अध्यक्ष म्हणून जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांच्या सुचनेनुसार उर्वरीत 2 हजार मे. टन युरीयाचा संरक्षित साठा जिल्ह्यातील शेतका-यांसाठी विक्रीकरीता मुक्त करण्यात येत आहे.
एमआरपी किंमती पेक्षा कुणी जास्त दराने युरीया व खत विकत असेल तर शेतक-यांनी कृषी विभाग, पंचायत समिती कृषी अधिकारी यांच्याकडे तक्रार नोंदवावी, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे.