राहुल मसुरे, जिवती तालुका प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन चंद्रपूर:- जिल्हा तील जिवती येथून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. जिवती येथील रुग्णसेवक प्रहारचे कार्यकर्ते जिवन तोगरे यांच्या संशयास्पद मृतदेह एका शेतात मिळून आल्याने संपूर्ण तालुक्यांत एकच खळबळ माजली आहे.
जिवन तोगरे सामाजिक कार्यकर्ते असुन प्रहारचे रुग्न सेवक होते व यांनी अनेक रक्त दान शिबीरे घेतली असुन हे रुग्णाला व समाजातील गोरं गरीब जनतेच्या नेहमीच हाकेला धाऊन जाणारे जिवन तोगरे यांचा आज सकाळी ८ ते ९ वाजताच्या सुमारास मरकागोंदी गावाच्या परिसरातील जंगलात मृतदेह आठळुन आला. गावालगत रोड पासुन अंदाजे २ ते ३ कि.मी अंतरावर हा मृतदेह शेतीमध्ये काम करण्या करीता गेलेल्या शेतकर्याला एका झाडा भोवती कावळ्यांच्या थवा भोवताना दिसत असल्या मुळे शेतकरी आश्चर्य चकीत झाला व येथे कावळे का भोवती आहेत हे पाहण्यासाठी शेतकरी जवळ जाऊन बघले असता एका झाडाखाली एक मनुष्य झोपलेला व त्यांच्या अंगावर माशा भोवताना दिसून आले व जवळच त्यांच्या बाजुला मोटार सायकल उभी होती काही कागदपत्रे. हे द्रुश्य पासुन शेतकरी गावात जाऊन हि माहीती सरपंचाला दिली व सरपंचा पासुन पोलीस स्टेशन पिटीगुडा येथील पोलीस अधीकारी यांना माहीती मिळताच पोलीस अधीकारी फौज फाट्यासह तात्काळ घटनास्थळी दाखल झाले.
मृतक जिवन तोगरे जिवती तालुक्यातील एक दमदार नेतृत्व असलेले प्रहार जनशक्ती संघटनेचे कार्यकर्ते होते आणी जिवन तोगरे अंदाजे तिनं दिवसांपासुन घरुन बेपत्ता होते. आई वडीलांनी चोहीकडे चौकशी करुन शेवटी आज दि.४ ला जिवती पोलीस स्टेशन मध्ये मुलगा बेपत्ता असल्याची तक्रार केली असल्याची माहीती समोर आली आहे.
तर घटनास्थळी जाऊन पोलीस अधिकाऱ्यांनी मृतक जिवन तोगरे याच्या नातेवाईकांना बोलावले व पार्थिव शरीर हे जिवनचे असल्याचे नातेवाईकांना ओळख पटली व पोलीस अधीकारी यांनी पंचनामा करुन व पार्थिव शरीर हे सडलेल्या अवस्थेत असल्यामुळे डॉक्टराना घटनास्थळी बोलावुन शवविच्छेदन करण्यात आले तर व डॉक्टर च्या रिपोर्ट नुसार पोलीस कार्यवाही करुन आपली जबाबदारी पार पाडतील व जिवन तोगरे यांच्या नातेवाईकांचा जिवन चे नैसर्गिक मरण नसुन हत्या झालली आहे. असे मत आहे पोलीस चौकशी शिग्रगतीने सुरु आहे. जिवन तोगरे यांच्या जाण्याची जिवती तालुक्यात सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
आपल्या परिसरातील बातम्या आणि प्रतिनिधी बनण्याकरिता आजच संपर्क साधावा प्रशांत जगताप संपादक 9766445348/7385445348

