विश्वास त्रिभुवन, अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन अहमदनगर:- जिल्हा तून एक भीषण अपघाताची माहिती समोर येत आहे. येथे स्कूल बसला ओव्हरटेक करण्याच्या नादात टेम्पोने समोरून येणाऱ्या कारला जोरदार धडक दिली. हा अपघात इतका भीषण होता की या अपघातामध्ये तीन जणांचा जागीच मृत्यू झाला असून सहा जण गंभीर जखमी झाले आहेत.
नगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील नगर-कल्याण महामार्गावर धोत्रे शिवारात शनिवारी सकाळी हा भीषण अपघात झाला. अपघातातील मृत आणि जखमी मुंबईतील कांदिवली येथील रहिवासी आहे. त्यात प्रीती धनंजय भावसार, वेदांत धनंजय भावसार, कारचालक रोशन या तिघांचा अपघातात जागीच मृत्यू झाला. तर जान्हवी अजय भावसार, अर्पिता धनंजय भावसार, ऋषिकेश अजय भावसार, धनंजय लकडु भावसार, जयेश प्रशांत भावसार, ओम प्रशांत भावसार हे जखमी झाले आहेत. जखमींवर नगर येथील रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत.
प्राप्त माहितीनुसार, भावसार कुटुंब कारने क्र. MH 15, JC 1903 मुंबईहून नगरकडे निघाले होते. याच दरम्यान टाकळी ढोकेश्वरच्या दिशेने निघालेला टेम्पोने महामार्गावर उभ्या असलेल्या स्कूलबसला ओव्हरटेक करण्याच्या नादात कारला समोरून धडक दिली. या अपघातात कारचा चक्काचूर झाला. अपघातानंतर टेम्पोचालक पसार झाला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विजय ठाकूर करत आहेत.
आपल्या परिसरातील बातम्या आणि प्रतिनिधी बनाण्याकरिता आजच संपर्क साधावा. प्रशांत जगताप संपादक 9766445348-7385445348

