ठाणेदार तिरुपती राणे यांचे उपस्थितीत केली कार्यवाही.
मुकेश चौधरी कार्यकारी संपादक
देवळी(वर्धा):- पोलीस स्टेशन देवळी हद्दीत येणाऱ्या अंदोरी पुलावरून चिखली कडे येणाऱ्या मालवाहू गाडी क्रमांक MH 29 BE 2607 व सुझुकी ॲक्स्सेस क्रमांक MH 29 B Q 4907 ला अडेगाव चौफुली येथे नाकाबंदी करून सापळा रचून प्रो रेड कारवाई केली असता यातील यवतमाळ येथील आरोपी याच्या ताब्यातून देशी दारू 10 पेटी किंमती 48,000 रुपये आणि बेलेरो पीक अप 8,00,000 रुपये व सुझुकी ॲक्सेस किंमती 50,000 रुपये असा एकूण 8,98,000 मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
वर्धा जिल्ह्यात संपूर्ण दारू बंदी आहे, पण मोठ्या प्रमाणात दारूची अवैध तस्करी सुरू आहे. त्यामुळे प्रशासनाच्या धडक कारवाई करून या अवैध दारू माफिया वर अंकुश लावावा अशी मागणी केली आहे.