अकोला जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन अकोला:- शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मधिल अधिष्ठाता डॉ. मिनाक्षी गजभिये यांच्या कार्यालयाच्या बाजुला असलेले शौचालय गेल्या एका वर्षापासून बंद होते. वैद्यकीय महाविद्यालयातील कर्मचाऱ्यांना नाहक त्रास सहन करावा लागत होता. एका कर्मचाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर उमेश सुरेशराव इंगळे महासचिव महाराष्ट्र राज्य रुग्णसेवक व श्रमिक कामगार संघटना महाराष्ट्र राज्य यांच्याकडे तक्रार करून सदर शौचालय कर्मचारी यांच्यासाठी उघडे करुन देण्याची विनंती केली होती.
याबाबत शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मधिल अधिष्ठाता मिनाक्षी गजभिये यांच्याशी या संदर्भात उमेश सुरेशराव इंगळे यांनी विचारणा केली असता, ते ब्लॉक झाल्याने त्यांची सफाई न झाल्याने बंद केले आहे. अशी उडवाउडवीची उत्तरे दिली होती. पंरतु एक दोन वर्षापासून बंद असलेले शौचालय दुरुस्ती करून आतापर्यंत का नाही उघडले हा प्रश्न कर्मचाऱ्यांना पडला होता. परंतु सदर घटना खोटी असुन अधिष्ठाता डॉ. मिनाक्षी गजभिये यांनी विनाकारण हे शौचालय बंद करून ठेवले होते. या अगोदर एक मुख्य प्रवेशद्वार बंद करण्यात आले होते, ते उमेश सुरेशराव इंगळे महासचिव महाराष्ट्र राज्य रुग्णसेवक व श्रमिक कामगार संघटना यांनी उघडे करुन दिले होते.
रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉ. मिनाक्षी गजभिये हे मनमानी करतात. अशी माहिती कर्मचारी यांनी दिली आहे. उमेश सुरेशराव इंगळे यांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय अधिष्ठाता डॉ. मिनाक्षी गजभिये यांना लवकरात लवकर हे शौचालय उघडे करावे अशी मागणी तथा विनंती केली होती. त्यांच्या मागणीची दखल घेत सदर शौचालय कर्मचाऱ्यांन करीता खुले करण्यात आले असून कर्मचारी यांनी उमेश सुरेशराव इंगळे महासचिव महाराष्ट्र राज्य रुग्णसेवक व श्रमिक कामगार संघटना यांचे आभार मानले.

