✒️प्रविण जगताप, वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी मोबा नंबर :- 9284981757
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- येथून एक संतापजनक घटना समोर आली आहे. येथे एका 11 वर्षीय व अन्य एक अल्पवयीन चिमुकलीला चॉकलेटचे आमिष दाखवून किराणा दुकानात जबरदस्ती बोलावून दोन चिमुकलींचा लैंगिक छळ केल्याची घटना घडली. ही घटना समोर येतात संपूर्ण शहरात मोठ्या प्रमाणात संताप व्यक्त करण्यात येत आहे. दिनांक 6 जून रोजी हिंगणघाट पोलिसांनी या नराधमाला अटक केली आहे. राजेंद्र रामराव झाडे, रा.हिंगणघाट असे अटक केलेल्या आरोपांचे नाव आहे.
प्राप्त माहितीनुसार, एक 11 वर्षीय अल्पवयीन चिमुकली आरोपी राजेंद्र झाडें याच्या किराणा दुकानात आठ दिवसांपूर्वी चॉकलेट घेण्यासाठी गेली असता आरोपी दुकानदाराने तिच्या सोबत तिच्या आई बाबत आक्षेपार्ह संवाद साधला होता. ही बाब पीडितेने तिच्या आईला सांगितली असता पीडितेच्या आईने आरोपीच्या पत्नीला ही बाब सांगितली होती. मात्र, याबाबत पीडितेच्या आईने पोलीस तक्रार दिली नव्हती. 3 जून रोजी दुपारच्या सुमारास पीडिता तिच्या मैत्रिणीसोबत राजेंद्र झाडे याच्या दुकानात पेप्सी व चॉकलेट आणण्यासाठी गेली असता आरोपी राजेंद्रने दोन्ही पीडितांना दुकानाच्या आत बोलावून तुम्हाला मी चॉकलेट व खाऊ फुकटात देतो, कुणालाही सांगू नका, असे म्हणत त्यांच्याशी लैंगिक चाळे केले. पीडिता तेथून निघून गेली मात्र, तिची मैत्रीण तेथेच थांबली होती. हा सर्व प्रकार पीडितेने तिच्या आईला सांगितला असता अखेर पीडितेच्या आईने याबाबतची तक्रार हिंगणघाट पोलिसांनी दिली घटनेचे गांभीर्य लक्षात घेत तत्काळ आरोपी राजेंद्र झाडे यास अटक केली. पुढील तपास हिंगणघाट शहर पोलिस करत आहे.
आज मोठ्या प्रमाणात महिला मुलीवर अत्याचार वाढत आहे. त्यामुळे अशा नराधम आरोपीवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी भावना हिंगणघाट शहरात नागरिकांची आहे.
आपल्या परिसरातील बातम्या करीता आजच संपर्क साधावा. प्रशांत जगताप संपादक 9766445348/7385445348

