श्याम भुतडा, बीड जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन बीड:- बायर क्रॉपसायन्स लिमिटेड या नामांकित मल्टिनॅशनल कंपनी मार्फत घेण्यात आलेल्या कॅम्पस इंटरव्ह्यू मधून आदित्य कृषि महाविद्यालयाच्या अंतिम वर्षात शिकत असलेल्या आठ (८) विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली. यामध्ये सहभागी विद्यार्थ्या पैकी अनिकेत जाधव, प्रसाद मोकळकर, हर्ष नंदनवार, रोहित पाटील, शंकर वड, ऋषिकेश शिंदे, अशोक घुले व स्वप्निल मोहिते या विद्यार्थ्यांनी यश संपादन केले.
बायर क्रॉपसायन्स लिमिटेड या नामांकित मल्टीनॅशनल कंपनीमध्ये निवड झाल्याबद्दल आदित्य शिक्षण संस्थेचे अध्यक्ष श्री सुभाषचन्द्रजी सारडा तसेच संचालिका व वसंतराव नाईक मराठवाडा विद्यापीठाच्या कार्यकारी संचालिका डॉ. आदितीताई सारडा मॅडम, प्रशासकीय अधिकारी डॉ. ए. टी. मुंडे सर, आदित्य कृषि महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. टी. बी. तांबे सर, कृषि अन्नंतत्रंज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य श्री शामजी भुतडा सर, कृषि जैतंत्रज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सतिश कचरे सर, कृषि अभयांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य श्री.अमोल सानप यांनी निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
यावेळी या कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन प्लेसमेंट अधिकारी डॉ. संदीप मोरेसर यांनी केले तसेच कॅम्पस इंटरव्ह्यू निवडीसाठी आलेले बायर क्रॉपसायन्स लिमिटेड या मल्टिनॅशनल कंपनीचे विभागीय अधिकारी श्री. अविनाश गोसावी व नागराज फुंदे यांचे मनःपूर्वक आभार मानले.