Monday, February 9, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home क्राईम

प्रवाशाचे कानाचा लचका तोडणा-या गुन्हेगार रिक्षा चालकास स्वारगेट पोलिसांनी केले जेरबंद

पंकेश जाधव by पंकेश जाधव
June 8, 2023
in क्राईम, पुणे, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र
0 0
0
प्रवाशाचे कानाचा लचका तोडणा-या गुन्हेगार रिक्षा चालकास स्वारगेट पोलिसांनी केले जेरबंद
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

पंकेश जाधव पुणे ब्यूरो चीफ 7020794626

स्वारगेट पोलिस स्टेशन पुणे शहर

महाराष्ट्र संदेश न्यूज ! ऑनलाईन पुणे :- स्वारगेट पोलीस ठाणे पुणे शहर गु.र.नं. १४८ / २०२३ मा.द.वि. ३०७,३२५.३४ क्रिमीनल लॉ अॅमेंडमेंट कलम ७ प्रमाणे गुन्हा दाखल असुन दाखल गुन्हयातील फिर्यादी हे दि.०५/०६/२०२३ रोजी ०१/०० वा सुमारास त्यांचे मुळगावी अलिबाग येथे जाणे कामी स्वारगेट एसटी स्टॅन्ड येथे रिक्षाने आले असता, सदर रिक्षा चालका बरोबर रिक्षाचे भाडयाचे कारणा वरुन वाद झाल्याने सदर रिक्षा चालक व त्याचे तेथील इतर दोन रिक्षा चालकाने सदर फिर्यादीस मारहाण करून रिक्षा चालकाने फिर्यादी यांचे वर कोयत्याने वार केला पण फिर्यादी यांनी सदर वार हुकविला व ते दोघेही खाली पडले असता रिक्षा चालकाने फिर्यादी यांचे कानाचा चावा घेवून कानाचा लचका तोडुन जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. म्हणुन वर नमुद गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदर आरोपी हा सराईत असुन तो बारामती येथे असले बाबत तपास पथकाचे पोलीस अंमलदार अनिस शेख व शिवा गायकवाड यांना बातमी मिळाल्याने सदर ठिकाणी जावून तांत्रिक विश्लेषणाद्वारे तपास करून खात्री केली असता सदर आरोपी हा सदर ठिकाणाहून पुणे येथे गेले असले बाबत माहिती मिळाली. त्यानंतर स्वारगेट पोलीस स्टेशन येथे येवुन सदर आरोपीचा शोध घेतला असता सदर आरोपी हा स्वारगेट एसटी स्टॅन्ड परिसरामध्ये येणार असले बाबत बातमी मिळाल्याने सदर बाबत मा. वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांना माहिती दिली असता त्यांनी सापळा लावुन ताब्यात घेणे बाबत आदेशित केल्याने सदर बातमी प्रमाणे स्वारगेट एसटी स्टॅन्ड परिसरा मध्ये तपास पथकाचे प्रभारी अधिकारी प्रशांत संदे व तपास पथकातील अंमलदार असे रात्रौ १०/०० या सुमारास सापळा लावुन थांबलो असता सदर आरोपी स्वारगेट एसटी स्टॅन्ड परिसरा मध्ये दिसुन आल्याने त्याचा पाठलाग करून त्यास ताब्यात घेवुन त्यास त्याचे नाव विचारले असता त्याने त्याचे नाव आदेश संजय काळे वय ३९ वर्षे रा. ६० / ३ पर्वती दर्शन पुणे असे सांगितले तसेच त्याने गुन्हा केल्याची कबुली दिल्याने त्यास दाखल गुन्हयात अटक करण्यात आली आहे तसेच सदर आरोपी हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असुन त्याचेवर ०३ खुनाचे व इतर ०४ गंभीर गुन्हे दाखल आहेत. गुन्हयाचा तपास अश्विनी बावचे, सहाय्यक पोलीस निरीक्षक स्वारगेट पोलीस स्टेशन पुणे शहर या करीत आहेत.

सदरची कामगिरी ही मा. अप्पर पोलीस आयुक्त, पश्चिम प्रादेशिक विभाग, पुणे शहर श्री प्रविणकुमार पाटील, गा. पोलीस उप आयुक्त, परिमंडळ २ पुणे शहर स्मार्तना पाटील, गा, सहा पोलीस आयुक्त स्वारगेट विभाग, पुणे शहर श्री नारायण शिरगावकर यांचे मार्गदर्शनाखाली स्वारगेट पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री अशोक इंदलकर, पोलीस निरीक्षक (गुन्हे) सोमनाथ जाधव यांच्या आदेशान्वये तपास पथकातील सहा. पोलीस निरीक्षक प्रशांत संदे, पोलीस उप निरीक्षक अशोक येवले व पो हवा मुकुंद चारु, शिवा गायकवाड, फिरोज शेख, रमेश चव्हाण, संदीप घुले, अनिस शेख, दिपक खेदाड, सुजय पवार, प्रविण गोडसे, मपोशि सांगोलकर यांनी एकत्र मिळुन केली आहे.

Previous Post

आदित्य कृषि महाविद्यालय बीड यांच्या विद्यमानाने आयोजित कॅम्पस इंटरव्ह्यू मधून विद्यार्थ्यांची बायर क्रॉपसायन्स लिमिटेड मल्टिनॅशनल कंपनीमध्ये निवड

Next Post

श्री तिरुपती बालाजी देवस्थान चुनाळा (मा) येथे श्री भगवान बालाजीचा पंचामृत अभिषेक संपन्न.

पंकेश जाधव

पंकेश जाधव

Next Post
श्री तिरुपती बालाजी देवस्थान चुनाळा (मा) येथे श्री भगवान बालाजीचा पंचामृत अभिषेक संपन्न.

श्री तिरुपती बालाजी देवस्थान चुनाळा (मा) येथे श्री भगवान बालाजीचा पंचामृत अभिषेक संपन्न.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In