सीमा सुरूशे, वाशिम जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन वाशिम:- येथून एक दुःखद घटना समोर आली आहे. साहित्य घेण्यासाठी दुचाकीने जात असलेल्या भारतीय सेनेतील जवानाला कारंजा मंगरूळपीर मार्गावरील पोटी फाट्यावर ट्रकने धडक दिली. यामध्ये योगेश सुनील पाडोळे सैनिकाचा दुर्दैवी मृत्यू झाला. ही दुःखद घटना 16 जून रोजी रात्रीचा सुमारास घडली. मृतक सैनिक योगेश सुनील आडोळे हे दोनच दिवसांपूर्वी सुट्टीवर गावी आले होते. मात्र, अपघातात त्यांचा मृत्यू झाल्याने संपूर्ण पोटी गावात शोककळा पसरली आहे.
लहानपणापासून सुनील पाडोळे यांचं देश सेवेचं स्वप्न होत त्यामुळे ते 2019 मध्ये भारतीय सैन्य दलात दाखल झाले होते. ते सध्या जम्मू काश्मीर येथील राजुरी येथे सीमेच्या रक्षणात कार्यरत होते. ते महिनाभराची सुट्टी घेऊन दोन दिवसांपूर्वीच गावी आले होते. 16 जून रोजी दुपारी मित्रांसोबत एक लग्न समारंभ आटोपून सायंकाळी गावी परतले. परंतु रात्री काही साहित्य घेण्यासाठी दुचाकीने जात असताना मंगरुळपीरकडून कारंजाकडे जाणाऱ्या भरधाव ट्रकने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. यामध्ये जबर मार लागल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.
मृतक योगेश हा आई-वडिलांचा एकुलता एक मुलगा होता. योगेश यांच्या घरची परिस्थिती जेमतेमच असून त्यांच्या पगारावरच घर चालत होते. त्यांच्या पश्चात घरी आई एकटीच असून लहान बहणीचे लग्न झाले आहे. अस अचानक अपघाती निधन झाल्याने संपूर्ण पोटी गावात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

