वैशाली गायकवाड उपसंपादक (पुणे)
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन पुणे:- वंचित बहुजन महिला आघाडी पुणे शहर उपाध्यक्ष प्रतिभाताई संदीप कांबळे यांच्या प्रयत्नातून एच वी देसाई हॉस्पिटल मोहम्मद वाडी यांच्या सौजन्याने शिव कॉलनी, साठे वस्ती, लोहगाव येथे दिनांक 17 जुन 2023 रोजी मोफत नेत्र तपासणी, चष्मे वाटप, मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर आयोजित करण्यात आले होते. त्यावेळी सहयोगीनी महिला बचत गट एक, दोन, तीन मधील सर्व महिलांनी तसेच त्या परिसरातील नागरिकांनी उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिला.
वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या आहे मोफत नेत्र तपासणी शिबिर मध्ये परिसरातील शेकडो नागरिकांनी लाभ घेतला. त्यात अनेक नागरिकच मोफत नेत्र तपासणी करून त्यांना चष्मे वाटप करण्यात आले. त्यानंतर वंचित बहुजन महिला आघाडी पुणे शहर अध्यक्षा अनिताताई चव्हाण यांच्या हस्ते संविधान उद्देशिकेचे वाटप करून सर्व महिलांचा पक्षप्रवेश करून घेण्यात आला तसेच पक्षाची भूमिका समजावून सांगण्यात आली. सर्व महिलांचे बचत गटाच्या माध्यमातून झालेल्या संघटनातून उत्कृष्ट असे काम करून पुढे देखील असेच नेहमी कार्यक्रम होऊ द्या ही सदिच्छा अनिता ताईंकडून व्यक्त करण्यात आली.
यावेळी डोळे तपासणी शिबिरासाठी जमलेल्या सर्व नागरिकांना देखील आपल्या सहयोगिनी बचत गटातील महिलांकडून संविधान उद्देशिकेचे वाटप करण्यात आले. वंचित बहुजन महिला आघाडी महासचिव सारिकाताई फडतरे तसेच युवा आघाडीचे पुणे शहर संघटक प्रमोदभाऊ वणशिव ह्यांनी देखील मोलाचे मार्गदर्शन केले. तसेच हडपसर विधानसभेच्या अध्यक्ष कोमलताई शेलार, पुणे शहर सदस्य विजयाताई ओव्हाळ, सचिव स्वीटीताई कांबळे, प्रभाग अध्यक्ष संदीपभाऊ कांबळे, महासचिव राकेशभाऊ गायमुक्ते, बहुउद्देशीय संस्थेचे संस्थापक सोपान माने काका व त्यांचे सहकारी, बार्टीच्या कीर्तीताई आखाडे मॅडम, लाईट हाऊसचे सोपान महाजन सर, प्रदिप भाऊ रोकडे, शेलार भाऊ आदी मान्यवरांनी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली त्याबद्दल सर्वांचे मनापासून व धन्यवाद मानण्यात आले.

