आकाश पांचाळ, पुणे शहर प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन पुणे:- येथून एक भीषण अग्नितांडवाची माहिती समोर येत आहे. पुण्यातील मार्केटयार्ड परिसरात असणाऱ्या एका गोडाऊनला भीषण आग लागली. पुण्यातील गंगाधाम चौकापुढील आईमाता मंदिराजवळ हे गोडाऊन आहे. या गोडाऊन ला ही भीषण आग लागली आहे. या आगीमुळे परिसरात मोठ्या झळा दिसत आहेत. यावरूनच आगीची भीषणता दिसून येत आहे.
पुण्यातील मार्केटयार्ड परिसरात असणाऱ्या गोडाऊनला भीषण आग लागली. गंगाधाम सोसायटीच्या जवळ असलेल्या काकडे वस्तीत जवळपास तीन एकर परिसरात ही आग पसरली आहे. आगीमुळे धुराचे लोळ दूरपर्यंत पसरले आहेत. रविवारी सकाळी साडेआठ ते नऊच्या सुमारास ही आग लागली आहे. या आगीने रौद्ररूप धारण केले आहे. आग लागल्याची माहिती मिळाल्यानंतर अग्निशमन दलाची सुमारे 22 वाहने घटनास्थळी दाखल झाली आहेत. ही आग नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत.
गंगाधाम चौकापुढे आईमाता मंदिराजवळ सुमारे 20 विविध साहित्याचे गोडाउन आगीच्या भक्ष्यस्थानी आहे. पुणे व पीएमआरडीए अशा एकूण 22 अग्निशमन वाहने घटनास्थळी असून, आग विझवण्याचे काम सुरू आहे. या आगीत अद्याप कोणी जखमी नसल्याची माहिती समोर आली आहे.अग्निशमन दलाकडून 22 वाहने घटनास्थळी दाखल झाली आहेत. ही आग आटोक्यात आणण्याचे काम वेगाने सुरू आहे. मात्र, आगीने रौद्ररुप धारण केले आहे. यामुळे परिसरातील काही इमारती खाली करण्याचे काम प्रशासनाकडून सुरु करण्यात आले आहे. या भागातील विविध प्रकारच्या 3 गोडाऊनला ही आग लागली आहे. दरम्यान, ही आग नेमकी कशामुळे लागली. यामागचे कारण अद्याप समजू शकले नाही.

