Monday, February 9, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home आंदोलन

वर्धा जिल्ह्यातील प्रस्तावित शासकीय वैद्यकीय महाविद्यालय हिंगणघाट ला करण्याबाबत २० दिवसापासून धरणे आंदोलन सुरू.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
June 18, 2023
in आंदोलन, आरोग्य, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, वर्धा, विदर्भ, हिंगणघाट
0 0
0
वर्धा जिल्ह्यातील प्रस्तावित शासकीय वैद्यकीय महाविद्यालय हिंगणघाट ला करण्याबाबत २० दिवसापासून धरणे आंदोलन सुरू.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

प्रविण जगताप वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- महाराष्ट्र राज्यामध्ये शासनाने घोषित केलेल्या नवीन १२ प्रस्तावित मेडिकल कॉलेज मध्ये वर्धा जिल्ह्याचा समावेश असून हे मेडिकल कॉलेज हिंगणघाट शहरात व्हावे अशी जोरदार मागणी हिंगणघाट येथील वैद्यकिय महाविद्यालय संघर्ष समिती, विद्यार्थी, नागरिक, सामाजिक स्वयंसेवी संस्था, व्यापारी संघटना, आंतरराष्ट्रीय मानवाधिकार सहायता संघ व सर्व राजकीय पक्ष यांनी एकत्रित येऊन पक्षभेद विसरून हिंगणघाट शहराचा विकासासाठी एकमुखाने कॉलेजची मागणी रेटून धरलेली आहे.

ह्या करिता शासनाचे लक्ष वेधून घेण्याकरिता शहरबंद करून जनजागृती रॅली काढली होती. उपविभागीय अधिकारी ते मुख्यमंत्री व राज्यपाल महोदया पर्यंत निवेदने दिलीत. आमदार, खासदार, उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री देवेंद्र फडणवीस व शरद पवार यांचीही भेट घेऊन चर्चा केली आणि हिंगणघाट ला मेडिकल कॉलेज का हवे हे पटवून देण्यात आले.

हिंगणघाट- समुद्रपुर तालुक्याची लोकसंख्या आताच्या घडीला ४.५० लाख असून हिंगणघाट येथील उपजिल्हा रुग्णालयात पुरेशी जागा उपलब्ध आहे. हे शहर उत्तर व दक्षिण जाणाऱ्या रेल्वे व राष्ट्रीय महामार्गावर असून चंद्रपूर, नागपूर व यवतमाळ या तीन जिल्ह्यांच्या सीमा लागलेल्या आहे. नागपूर – चंद्रपूर वर्दळीचा महामार्ग ह्याच परिसिमेतून जातो. तेलंगणा राज्याची सीमा जवळच आहे. राज्यातील दुसऱ्या क्रमांकाची कृषी उत्पन्न बाजार समिती हिंगणघाट असून प्रमुख व्यापारी बाजारपेठ आहे. भौगोलिक दृष्टीने हिंगणघाट हे मध्यवर्ती शहर असून ‘अ’ दर्जाची सर्वात जुनी नगरपालिका आहे. असे असूनही व्यावसायिक शिक्षणाच्या दृष्टिकोनातून अत्यंत मागासलेले शहर आहे. येथे कोणत्याही प्रकारचे उच्च व्यावसायिक शिक्षण देणारी कोणतीही संस्था नाही. येथे असलेल्या रुग्णालया मध्ये पुरेश्या सोयी नसल्याने रुग्णालयांना छोट्या छोट्या कारणास्तव बाहेर गावाला पाठवावे लागतात. येथे रुग्णांची संख्या व अपघातग्रस्तांचे प्रमाण अधिक असल्याने तात्काळ उपचारा करिता शासकीय वैद्यकीय महाविद्यालय होणे अतिशय महत्त्वाचे आहे.

मेडिकल कॉलेजच्या या मागणी करिता दिनांक २९ मे २०२३ डॉ. आंबेडकर पुतळा समोर सायंकाळी ६.३० ते ९ वाजे पर्यंत बेमुदत धरणे आंदोलन सुरू असून विद्यार्थी, महिला व पुरुषांच्या मोठ्या प्रमाणात सहभाग दिसून येत आहे. वीस दिवसा पासून हे आंदोलन सुरू असून शासन, प्रशासनाने, स्थानिक लोकप्रतिनिधीने अजून पर्यंत दखल न घेतल्यामुळे ह्या आंदोलनाचा विस्तार ग्रामीण विभागात पसरविण्याचा निर्धार संघर्ष समिती व सर्व पक्षीय आंदोलनकर्त्यांनी व्यक्त केलेला आहे. हे मेडिकल कॉलेज अभी नही तो कभी नही अशी भावना नागरिकांची आहे.

आजच्या या धरणे आंदोलनाचा विसाव्या दिवशी विविध घोषणांचे हस्त फलक घेऊन जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. यामध्ये विविध क्षेत्रातील महिला व नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद होता. यात मेडिकल कॉलेज संघर्ष समितीचे अध्यक्ष सुनील पिंपळकर, कार्याध्यक्ष वासुदेव पडवे, सहकार्याध्यक्ष जगदीश वांदिले, माजी आमदार राजुभाऊ तिमांडे, अतुलभाऊ वांदिले, पंढरीनाथ कापसे, अक्षय बेलेकर, गजानन नांदुरकर, राजू मुडे, अजय परबत, सुनील भुते, सतीश धोबे, श्याम इडपवार, दशरथ ठाकरे, प्रलय तेलंग, अनिल भोंगाडे, अनिल जवादे, प्रविन उपासे, गजु कुबडे, सुरेंद्र बोरकर, गजानन काटवले, गुणवंत कारवटकर त्यासह महिलांनमध्ये चंदा येलेकर, विद्या गिरी, कल्पना हिवंज, सीमा तिवारी, अनिता राऊत, सोनाली लसने, बेबी बोरकुटे, रत्नमाला टापरे, माधुरी मालेकर, शितल तिवारी, पौर्णिमा मस्के, अर्चना नांदुरकर, पल्लवी घोडे, अश्विनी चौधरी, सविता मैत्रे, वैशाली वानकर, शुभांगी मैत्रे, अर्चना रोंघे, ज्योती धोपटे, नंदा गोंडाने, मृणालिनी शेंडे, सुनीता सेनाड, मुक्ता मडावी, गीता मेश्राम, स्नेहा निमगडे, अल्का मानवटकर, पल्लवी घोडे, ज्योत्स्ना बावणे, वैशाली ठाकरे, सविता मेघे, अविनाश धोटे, अनिल भुते, सुरेंद्र टेंभुरणे, जावेद मिर्झा, नदीम अली, रवी कुटे, प्रवीण श्रीवास्तव, शाहरुख बक्ष, संतोष विहिरकर,मुघल शेख, रफिक पत्रकार, हर्षल गुंडे, दिनेश धोटे, रुपेश काटकर, सुधाकर बंगाले, प्रशांत मेश्राम, डॉ.जगताप, नरेश खडगी, पंकज भट, गजानन महाकालकर, निशिकांत सिंगरू इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते.

Previous Post

सरकार आणि प्रशासनाला सद्बुद्धी यावी म्हणून, प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने 19 जून ला हिंगणघाट येथे सद्बुद्धी आंदोलन.

Next Post

गावठी हातभट्टी दारुचे व्यवसायाचे आधारे लोणीकाळभोर पोलीस स्टेशन व पुणे शहर परिसरात दहशत माजविणारे दोन हातभट्टी वाले अमरावती व नागपुर कारागृह येथे एक वर्षा करीता स्थानबध्द केले.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
गुन्हे शाखा युनिट ३ यांची उत्कृष्ट कामगीरी  १० तासात खुनातील अरोपी गजाआड….

गावठी हातभट्टी दारुचे व्यवसायाचे आधारे लोणीकाळभोर पोलीस स्टेशन व पुणे शहर परिसरात दहशत माजविणारे दोन हातभट्टी वाले अमरावती व नागपुर कारागृह येथे एक वर्षा करीता स्थानबध्द केले.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In