✒️प्रविण जगताप, वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी
मोबा नंबर :- 9284981757
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- शहरात प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने आरोग्य सेवेच्या संदर्भात शासनाला ईश्वराने सद्बुद्धी द्यावी यासाठी एकदिवसीय धरणे आंदोलन दि १९ जूनला दुपारी 11 ते 5 या वेळेत महात्मा गांधी पुतळ्याजवळ कारंजा चौक हिंगणघाट येते करण्यात येणार आहे.
हिंगणघाट शहरात उपजिल्हा रुग्णालयात अतिदक्षता विभाग ICU चे उद्घाटन करण्यात आले. पण अजून प्रयत्न ते बंदच आहे. त्यामुळे हिंगणघाट तालुक्यातील नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे. त्यात गरोधर महिलांना साध सोनोग्राफी करीता खाजगी दवाखान्यात जाउन सोनोग्राफी करून घ्यावी लागते आहे. गरोदर महिला प्रसूती करीता उपजिल्हा रुग्णालयात उपचारांसाठी आणले असता त्याना जील्हाच्या ठिकाणी रेफर केल्या जाते. तर मग ICU आणि इतका मोठे रुग्णालय काय शोभा वाढवण्यासाठी बनवलं काय असे प्रश्न निर्माण झाला आहे. अशा विविध विषयांला घेऊन प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने गजु कुबळे यांच्या नेतृत्वात सद्बुद्धी आंदोलन करण्यात येणार आहे.
आंदोलनाचे विषय
१)हिंगणघाट उपजिल्हा रुग्णालयात २९ एफ्रिलला वाजागाजा करून लोकार्पण करून अजून ही तज्ञ डॉक्टर अभावी बंद असलेले मॉड्युलर आय.सि. यु.तात्काळ सुरू करण्यात यावे व त्या करिता तज्ञ डॉक्टरची नियुक्ती करण्यात यावी.
२) प्रायश्चित आंदोलनात यश म्हणून फक्त गर्भवती महिलांची सोनोग्राफी उपजिल्हा रुग्णालयात सुरू आहे परंतु दुसऱ्या कोणत्याही रुग्णाची सोनोग्राफी तज्ञ डॉक्टर नसल्याने होत नाही त्या साठी दि.24 एप्रिलला नियुक्त केलेले सोनोग्राफी तज्ञ डॉक्टर डॉ. रेवतकर यांना तात्काळ उपजिल्हा रुग्णालय हिंगणघाट येथे उपस्थित राहण्या संदर्भात सक्तीचे आदेश देण्यात यावे.
३) हिंगणघाट येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय यावे यासाठी शासनाने तात्काळ निर्णय घ्यावा.
या तीन ही मागण्या संदर्भात शासनाला व प्रशासनाला सद्बुद्धी यावी यावी म्हणून महात्मा गांधी यांच्या पुतळ्याजवळ कारंजा चौक हिंगणघाट येथ सकाळी 11 ते 5 पर्यंत हे आंदोलन करण्यात येणार आहे. तरी या आंदोलनाला पाठिंबा देण्याचे आव्हान प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने करण्यात आले आहे.

