आकाश पांचाळ, पुणे शहर प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन पुणे:- येथून एक खळबळजनक माहिती समोर आली आहे. नकली कागदपत्रांच्या आधारे नौकरी मिळवलेल्या अभियांत्यावर पुणे महानगर पालिका आयुक्तांनी कारवाई केली त्यात पुणे महानगर पालिकेतील तीन कनिष्ठ अभियांत्याना सेवेतून बडतर्फ केले त्यामुळे पुणे महानगर पालिका प्रशासनात एकच खळबळ माजली आहे.
पुणे महानगर पालिकेतील कनिष्ठ अभियंता भरतीमध्ये अनुभवाचे खोटे पुरावे सादर करून नोकरी मिळविलेल्या तीन कनिष्ठ अभियंत्यांना सेवेतून बडतर्फ करण्यात आले आहे. अतिरिक्त आयुक्त रवींद्र बिनवडे यांनी यासंबंधीचे आदेश दिले. महानगर पालिका प्रशासनाने गत वर्षी 448 विविध पदांसाठी भरती प्रक्रिया राबविली होती. त्यामध्ये कनिष्ठ अभियंत्यांच्या 142 जागांची भरती करण्यात आली. तीन वर्षांचा अनुभवाचा पुरावा म्हणून फॉर्म 16, बँक स्टेटमेंट, पे स्लीप, अनुभव प्रमाणपत्र, पीएफ क्रमांक यांसह 11 प्रकारची कागदपत्रे मागीतली होती. पण या लोकांनी बनावटी कागद पत्र सादर केली होती.
कनिष्ठ अभियंता पदाच्या गुणवत्ता यादीत आलेल्या काही उमेदवारांनी सादर केलेल्या कागदपत्रात पे स्लीप, अनुभव प्रमाणपत्र यांसारखी कागदपत्र बनावट दिली असल्याचा आरोप झाला होता. त्यात भरती झालेल्या काही अभियंत्यांनी अभियांत्रिकी पदविकेच्या आधारावर नोकरी मिळवताना अभियांत्रिकीची पदवी लपविली तसेच अभियांत्रिकी पदवी एका शहरात, तर पूर्ण वेळ नोकरीचे ठिकाण मात्र दुसर्याच शहरात असेही प्रकार आढळून आले होते. यासंबंधीच्या तक्रारी आल्यानंतर आयुक्त विक्रम कुमार यांनी सेवकवर्ग विभागाचे उपायुक्त सचिन इथापे, शहर अभियंता प्रशांत वाघमारे आणि मुख्य लेखा परीक्षक अमरिश गालिंदे या तीन अधिकार्यांची चौकशी समिती नेमली होती. त्यात कनिष्ठ अभियंता म्हणून भरती झालेल्या 50 जणांची कागदपत्रे तपासण्यात आली. चौकशी समितीच्या अहवालानुसार तीन कनिष्ठ अभियंत्यांनी अनुभवाचे बनावट दाखले जोडल्याचे आढळले. त्यामुळे या लोकांवर कारवाई करण्यात आली.